आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे मेट्रोकडून महाकाय भुयार पूर्ण:10 महिन्यांत 12 किमी बोगदा खणला; तिरंगा फडकावत केले अंडरग्राऊंड सेलिब्रेशन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते बुधवार पेठ या भूमिगत मार्गाच्या बोगद्याच्या शेवटच्या टप्प्याचे काम बुधवारी पूर्ण झाले. टीबीएम मुळा-2 ने बुधवार पेठ मेट्रो स्थानकावर ब्रेक थ्रू करण्यात शनिवारी यश मिळवले आहे. 5 सप्टेंबर 2021 रोजी स्वारगेट पासून सुरू झालेले खोदकाम मंडई स्थानक ओलांडून बुधवार पेठ येथे 2.025 किमी बोगदा तयार करून अंदाजे 10 महिन्यांत बाहेर आले आहे. पुणे मेट्रोने गाठलेला हा टप्पा म्हणजे एकूण 12 किमी लांबीच्या भूमिगत बोगद्याचे संपूर्ण काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी 5 ब्रेकथ्रू

पुणे मेट्रोला एकूण 33.2 किमी लांबीचे दोन कॉरिडॉर आहेत. एक वनाज ते रामवाडी जी एक उन्नत लाइन आहे आणि दुसरी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट जी पिंपरी-चिंचवड ते कृषी महाविद्यालय पर्यंत उन्नत आहे आणि त्यानंतर स्वारगेट पर्यंत भूमिगत आहे. भूमिगत विभाग सुमारे 6 किमी आहे आणि या भागामध्ये शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानके आहेत. भूमिगत विभागात अप आणि डाऊन मेट्रो ट्रेनसाठी दोन समांतर बोगद्यांचा समावेश आहे. 6 किमी बोगद्याच्या कामासाठी तीन टीबीएम वापरण्यात आले. या टनेल बोअरिंग मशिन्सना (टीबीएम) पुण्यातील नद्यांची मुळा, मुठा आणि पवना ही नावे देण्यात आली आहेत. जेव्हा टीबीएम बोगद्याचे काम पूर्ण करते आणि स्टेशन शाफ्टवर येते, तेव्हा या घटनेला ब्रेकथ्रू असे संबोधले जाते. सध्याची घटना म्हणजे पुणे मेट्रोचे शेवटचे ब्रेकथ्रू आहे. यापूर्वी 5 ब्रेकथ्रू झाले होते.

अत्यंत आव्हानात्मक भाग

पुणे मेट्रो प्रकल्पाचा भुयारी भाग हा अत्यंत आव्हानात्मक आणि महत्त्वाचा भाग आहे. तांत्रिक कौशल्य आणि ठोस प्रकल्प व्यवस्थापनामुळे बोगद्याचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झाले आहे. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे ट्रॅक, सिग्नलिंग आणि ट्रॅक्शनच्या कामासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

अभिमानाचा क्षण

याबद्दल, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, पुणे मेट्रोच्या बोगद्याचे काम अत्यंत अचूक आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाने करण्यात आले. ही अंतिम प्रगती 12 किमी बोगदा मार्ग पूर्ण झाल्याची खूण असून महामेट्रोसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. पुण्यातील नागरिक आणि प्रशासकीय संस्थांच्या सक्रिय पाठिंब्या शिवाय पुणे मेट्रो प्रकल्पाच्या भूमिगत मार्गाचे काम वेगाने आणि यशस्वीपणे पूर्ण झाले नसते. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी महामेट्रो कटिबद्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...