आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने दिली लग्न करण्याची धमकी, वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील हडपसर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या प्रियकरानी मुलीच्या वडिलांना काही झाले तरी मी तुमच्या मुलीशीच लग्न करणार असल्याची धमकी दिली. त्यामुळे संबंधित मुलीच्या वडिलांनी बाथरूम मध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी आरोपी मुकेश गोपाळ देढे (वय 21, राहणार चंदननगर, खराडी, पुणे )याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. परमेश्वर रमेश पात्रे (वय 40 )असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नेमकी काय आहे घटना?

याप्रकरणी जया परमेश्वर पात्रे (वय 34 ) यांनी आरोपी मुकेश देढे याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार जून 2022 ते 7 मे 2023 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश देढे याने तक्रारदार जया पात्रे यांचे पती परमेश्वर पात्रे यांना त्यांच्या 15 वर्षाच्या मुलीशी मी लग्न करणार आहे, तुम्हाला काय करायचे ते करा. जर तुम्ही तुमच्या मुली सोबत माझे लग्न लावून दिले नाही तर तिचे दुसरीकडे कुठेही लग्न होऊन देणार नाही अशी धमकी आरोपीने त्यांना दिली.

या कारणामुळे परमेश्वर पात्रे यांनी त्यांच्या राहते घरासमोरील बाथरूम मध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. सोनटक्के पुढील तपास करत आहे.