आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील काेंढवा परिसरात कराटे क्लासेस घेणाऱ्या एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीस घरी बाेलवून तिच्यावर बळजबरीने शारिरिक संबंध केल्याचा प्रकार उघडकीस आला हाेता. याप्रकरणी असिफ रफिक नदाफ (वय-31,रा.काेंढवा,पुणे) या आराेपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.साळुंखे न्यायालयाने दहा वर्ष कैद व 17 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे अशी माहिती सरकारी वकील प्रमाेद बाेंबटकर यांनी शुक्रवारी दिली आहे.
याप्रकरणी आराेपीवर सन 2018 मध्ये काेंढवा पाेलीस ठाण्यात बलात्कार व पाेक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्या आलेला हाेता. सदरची घटना ऑगस्ट 2016 ते जानेवारी 2017 यादरम्यान घडलेली आहे. संबंधित पिडित मुलगी ही काेंढवा येथे आराेपीच्या कराटे क्लास मध्ये कराटे शिकण्यास जात हाेती.
त्यावेळी आराेपी असिफ नदाफ याने तिला ‘माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे’ असे सांगुन तिला राहते घरी काेणीही नसताना घेऊन गेला. त्यानंतर तिच्या आईवडीलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याने वेळाेवेळी अल्पवयीन मुलीस घरी बाेलवून घेत तिच्यासाेबत जबरदस्तीने शारिरिक संबंध करीत हाेता. यामुळे संबंधित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर याबाबतचा प्रकार पिडित मुलीच्या कुटुंबियांना समजल्यावर त्यांनी आराेपी विराेधात पाेलीसांकडे तक्रार दाखल केली. यादरम्यान तिला बाळ ही झाले. दरम्यान, मुलीच्या आईवडीलांची घरात सारखी भांडणे हाेत असल्याने मुलगी घाबरलेली असल्याने तिने कराटे शिक्षक त्रास देत असल्याचे घरात काेणाला सांगितले नव्हते. परंतु ती गराेदर असताना हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणात पिडित मुलीची साक्ष, सर्व घटनाक्रम, मुलींचा पाेलीसां समाेरील जबाब, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समाेरील कलम 164 चा जबाब व न्यायालयातील जबाब सुसंगत हाेता. घटनेच्या वेळी मुलगी अल्पवयीन असल्याने तिची तथाकथित संमती ग्राहय धरता येणार नाही आदी मुद्दे न्यायालयाने लक्षात घेऊन आराेपीस शिक्षा सुनावलेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.