आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध:पुणे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे मुस्लिम कार्यकर्त्यांच्या भेटीला, फेसबूकवर शेअर केली भावनिक पोस्ट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे पुण्यात पक्षाचा किल्ला ढासळताना दिसत आहे. पक्षप्रमुख राज ठाकरेंच्या विरोधात भुमिका घेत पुणे मनसेचे शहराध्यक्ष आम्ही मशिदींवरील भोंग्यांविरोधात नोटीसा देणार नाही आणि मशिदींसमोर हनुमान चालीसाही लावणार नाही, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यानंतर आज नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी वसंत मोरे थेट त्यांच्या घरीच पोहोचले. अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांनी त्यांची विचारपूस केली व भेटीनंतर एक भावनिक पोस्टही फेसबुकवर शेअर केली आहे.

कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर वसंत मोरे यांनी केलेली फेसबुक पोस्ट
एखाद्या किल्ल्याचे बुरुज ढासाळायला लागले की किल्ला पडायला ही वेळ लागत नाही. एखादा नेता पक्षाचा राजीनामा देतो तेव्हा नक्की त्याचा काहीतरी स्वार्थ असतो. पण जेव्हा एखादा शाखा अध्यक्ष , एखादा कार्यकर्ता राजीनामा देतो ना तेव्हा त्याला जरूर समजावून संगायला पाहिजे. आज शाखा अध्यक्ष माजिद शेख व वाहतूक उपशहराध्यक्ष शहाबाज पंजाबी यांच्या घरी गटनेत्यांसह त्यांना भेटून आलो. त्यामुळे पोरांच्या चेहऱ्यावर काय हसू आलं राव.

नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांची भेट घेत वसंत मोरे यांनी त्यांची समजूत घातली.
नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांची भेट घेत वसंत मोरे यांनी त्यांची समजूत घातली.

वसंत मोरे यांचा वैचारिक गोंधळ!
पुणे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभुस यांनी मात्र वसंत मोरे यांचा वैचारिक गोंधळ झाला असेल. त्यांनी घेतलेली भूमिका ही पक्षाची भूमिका नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे पुण्यात मनसे नेत्यांमधील वाद आता स्पष्ट झाला आहे. तसेच, मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी आम्ही पुणे पोलिसांना पत्र दिले असून त्यांना 3 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर किती जणांनी शहरात स्पिकर लावले? - वसंत मोरे
पुणे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभुस यांनी भूमिका मांडल्यानंतर वसंत मोरे यांनीही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मी पक्षाची नव्हे तर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका मांडली आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्यांनी मला सांगू नये. माझी भूमिका मी राज ठाकरे यांनाही समजावून सांगेल. कारण मला माझा प्रभाग नाही तर शहर शांत ठेवायचे आहे, अशा शब्दांत त्यांनी पुण्यात भोंग्यांविरोधात भूमिका घेणाऱ्यांना सुनावले आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या भाषणानंतर किती जणांनी शहरात स्पीकर लावले?, असा सवाल करत वसंत मोरेला पक्ष भूमिकेबद्दल शिकवू नये, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...