आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग:शाळेच्या आवारात छेड काढणाऱ्या अज्ञाताविरोधात तक्रार दाखल

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील शुक्रवार पेठेतील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीचा शाळेच्या आवारात एका 18 ते 20 वयाेगटातील अनाेळखी तरुणाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या 28 वर्षीय आईने खडक पोलिस ठाण्यात अज्ञात आराेपी विराेधात फिर्याद दाखल केल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा प्रकार सहा मार्च राेजी दुपारी तीन वाजता घडला आहे. तक्रारदार महिला यांची 11 वर्षाची मुलगी नेहमी प्रमाणे घरातून शाळेत गेलेली हाेती. शाळेच्या आवारात तळमजल्यावरुन तिचे वर्गात ती जात असताना, तिने आराेपीस ‘दादा शाळा भरली का’ अशी विचारणा केली. त्यावेळी आराेपीने मुलीचे जवळ येवुन तिचे कंबरेत हात घालुन तिला जवळ ओढून तिचे पाठीवरुन हात फिरवुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच, पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आहे. तसेच शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांच्याकडे आरोपी माहिती बाबत चौकशी करण्यात आली आहे. तसेच सदर परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पाहणी करत अज्ञात आराेपीचा शाेध सुरु केला आहे. याबाबत पुढील तपास खडक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस साेनवणे करत आहे.

शाळकरी मुलीस पळवून नेले

कॅम्प परिसरात प्रसिध्द शाळेत शिक्षण घेणाऱ्या 13 वर्षाची अल्पवयीन मुलगी शाळेत जाते असे सांगुन घरातून बाहेर पडली. परंतु ती शाळेतून घरी परतली नसून अज्ञात आराेपीने कशाचे तरी अमिष दाखवून सदर मुलीस पालकांच्या कायदेशीर रखवालीतून फुस लावून पळून नेल्याची तक्रार मुलीच्या 39 वर्षीय आईने लष्कर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आराेपीवर गुन्हा दाखल करुन मुलीचा शाेध सुरु केला आहे.

बातम्या आणखी आहेत...