आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:फी'च्या वादातून महिला वकीलांचा विनयभंग, शिवीगाळ करत केली मारहाण; आरोपीला पोलिसांकडून अटक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका 34 वर्षीय महिला वकिलाचे पक्षकारा सोबत फी वरून झालेल्या वादातून पक्षकाराने संबंधित वकील महिलेस 'मी बुधवार पेठेत राहतो आणि तुला वेश्याव्यवसायास लावतो 'असे म्हणून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला आहे.

त्यानंतर आरोपीने संबंधित वकील महिलेस शिवीगाळ करून तिला मारहाण केल्याने पोलिसांकडून संबंधित आरोपीस अटक करण्यात आले आहे अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी मंगळवारी दिली आहे.

वसीम सलीम शेख (वय- 37 ,रा. बुधवार पेठ, पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 34 वर्षे वकील महिलेने पोलिसांकडे आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार तीन एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात घडला आहे. याबाबत माहिती अशी की, संबंधित तक्रारदार महिला ही वकील असून तिच्या ओळखीचा वसीम शेख हा आरोपी आहे.

शेख यानी वकिलास फोन करून बंडगार्डन पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विक्री प्रकरणात त्याचा साथीदार जायदून मलिक यास अटक करण्यात आल्याची माहिती दिली. त्यास न्यायाल्यात जामीन मिळवून देण्यासाठी वकिलांनी प्रयत्न करावे असे सांगण्यात आले. त्यानुसार वकील महिलेने आरोपी मलिक यास जामीन करून दिला होता.

मात्र, त्यानंतर वसीम शेख आणि वकील महिला यांच्या फी वरून वाद झाला.त्यानंतर आरोपी वसीम शेख यांनी वकील महिलेस' मी वेश्याव्यवसायास महिला विकणारा माणूस असून तुलाही बुधवार पेठेत बसवतो' असे म्हणत तिच्या स्त्री मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर महिलेस शिवीगाळ करून तिला जोरात पकडून ठेवत तिला हाताने व लाथेने मारहाण करून जखमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस साळवे पुढील तपास करत आहे.