आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात तरुणावर सावकाराचा जाच:पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी, परतफेडीनंतर सावकाराने केली अधिक पैशांची मागणी

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील वाघाेली परीसरात सावकाराने परतफेड झाल्यानंतरही एका तरूणाकडून अधिक पैशांची मागणी करत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने कामाकरिता व्याजाने एका खासगी सावकराकडून 30 हजार रुपये घेतले हाेते. त्याबदल्यात त्याने 40 हजार रुपयांची परतफेड केल्यानंतरही सावकराने आणखी 30 हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी पाेलिसांकडे तक्रार आल्यानंतर पाेलिसांनी या सावकरावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी गुरूवारी दिली आहे.

अक्षय विजय आल्हाट (वय-25,रा.धानाेरी,पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपी सावकाराचे नाव आहे. याबाबत विश्रांतवाडी पाेलिस ठाण्यात परशुराम साेमनाथ जाधव (वय-30,रा.वाघाेली,पुणे) याने पाेलिसांकडे आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना 17 डिसेंबर 2022 ते आजपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

आणखी पैशांची मागणी

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार परशुराम जाधव याने आराेपी अक्षय आल्हाट यांचेकडून ३० हजार रुपये कामासाठी 15 टक्के व्याजाने घेतले हाेते. त्याकरिता त्याची दुचाकी ही त्याने सावकराकडे गहाण ठेवलेली हाेती. तक्रारदार जाधव याने उधार घेतलेल्या पैशाच्या बदल्यात व्याजापाेटी 40 हजार रुपये राेख दिले असता, आणखी 30 हजार रुपयांची मागणी सावकाराने केली. आणखी पैसे दिले नाही तर खराडी मधून उचलून घेऊन जाईन तसेच जीवे ठार मारण्याची धमकी सावकराने तक्रारदारास दिली.

जीवे मारण्याची धमकी

तसेच पाेलिस माझे ओळखीचे आहेत, तुला साेडणार नाही असे म्हणत तक्रारदाराच्या घरी येऊन त्याच्या आई वडीलांना देखील सावकार अक्षय आल्हाट याने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी परशुराम जाधव यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, खंडणी विराेधी पथकाने याबाबतची खातरजमा करुन आ​​​​​​​राेपी सावकराविराेधात भादंविच्या कलम 387, 504, 506 सह महाराष्ट्र सावकार अधिनियम 39, 45 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत पुढील तपास विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस महानाेर करत आहे.

बातम्या आणखी आहेत...