आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्हयातील विविध भागात माेटारसायकल चाेरी करणाऱ्या आंतरजिल्हा टाेळीच्या दाेन महाेरक्यांसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. पाेलिसांनी या आरोपींकडून 10 लाख रुपये किंमतीच्या 29 माेटारसायकल जप्त करण्यात आल्या. पुणे ग्रामीण पाेलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
अमाेल नवनाथ मधे, विजय संजय मधे, संताेष उमेश मधे, संदिप सुभाष मधे, विकास साहेबराव मधे (सर्व रा.पारनेर, अहमदनगर),विजय विठ्ठल जाधव, सुनील वामन मेंगाळ, भारत पाेपट मेंगाळ, मयुर गंगाराम मेंगाळ ( सर्व रा.संगमनेर, अहमदनगर) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.
पुणे ग्रामीण जिल्हयात मागील वर्षभरात माेटारसायकल चाेरीचे प्रमाण वाढले हाेते. त्या अनुषंगाने पाेलिस अधीक्षक अंकित गाेयल यांनी एलसीबीचे पथकास माेटारसायकल चाेरांवर लक्ष्य केंद्रित करण्यास सांगितले हाेते. माेटार सायकल चाेरांचा आढावा घेत असताना, माेटारसायकल चाेरी करण्याची वेळ, निवडलेली ठिकाणे, चाेरी करण्यासाठी वापरण्यात येणारे मार्ग तसेच चाेरटयांनी अवलंबलेली पध्दत याचा बारकाईने अभ्यास करत, कारवाईसाठी प्रथम पुणे-नाशिक रस्त्याची निवड केली गेली.त्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आले. तपास पथकास याेग्य मार्गदर्शन करुन तपास काैशल्य सांगून कारवाईचे आदेश देण्यात आले हाेते.
कारवाईचे पथक
जुन्नर विभागात स्थानिक गुन्हे शाखेचे काम करणाऱ्या सपाेनि महादेव शेलार यांचे पथकास माेटार सायकल चाेरी करणाऱ्या आंतरजिल्हा टाेळीची गाेपनीय माहिती मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी कारवाई सुरु केली. या दरम्यान, गुन्हयाची व्याप्ती माेठी असल्याचे लक्षात येताच आणखी एक तपास पथक तयार करण्यात आले. दाेन्ही तपास पथकाने अहमदनगर जिल्हयातील आंतरजिल्हा टाेळीच्या दाेन महाेरक्यांसह नऊ जणांना जांबूत फाटा परिसरातून अटक केली.
पुणे ग्रामीण, अहमदनगर व ठाणे ग्रामीण जिल्हयातील माेटारसायकल चाेरीचे व घरफाेडी चाेरीचे एकूण 26 गुन्हे उघडकीस आले असून पाेलिसांनी दहा लाख रुपये किंमतीच्या 29 माेटारसायकल जप्त केल्या आहेत. चाेरी गेलेल्या माेटारसायकल या ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग तसेच नाेकरदार लाेकांच्या हाेत्या.
ही कारवाई पाेलिस अधीक्षक अंकित गाेयकल, अपर पाेलिस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पाेलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपाेनि महादेव शेलार, पाेसई गणेश जगदाळे, सफाै तुषार पंदारे, पाेहवा दिपक साबळे, विक्रम तापकीर, हेमंत विराेळे, मंगेश थिगळे, राजू माेमीण , जर्नादन शेळके, याेगेश नागरगाेजे, पाेना संदिप वारे, पाेकाॅ अक्षय नवले, चासफाै मुकुंद कदम, अक्षय सुपे यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.