आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) कर सहयाक आणि क्लार्क परीक्षेसाठी आत्तापर्यंत महाराष्ट्र परीक्षा परिषद नुसार टायपिंग कौशल्य चाचणीचे 'जीसीसी टीबीसी' प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात होते. मात्र, अचानक केलेल्या नवीन बदलाने सदर परीक्षेच्या अंतिम चाचणीसाठी कमी वेळेत दुप्पट शब्द मर्यादा वेग करण्यात आल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. बालगंधर्व रंगमंदिर समोर विद्यार्थ्यांनी सोमवारी पुन्हा आंदोलन करत अन्यायकारक बदल रद्द करा अशी मागणी केली आहे.
एमपीएससीने क्लर्क परीक्षेसाठी 16 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रतेमध्ये 29 मार्च 23 रोजी अचानक बदल केले. या नोटिफिकेशनद्वारे पात्रतेमध्ये केलेले बदल रद्द करावा व पूर्वी जाहिरातीमध्ये दिल्या पात्रतेप्रमाणेच परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
2200 की डिप्रेशन
कौशल्य चाचणीसाठी राज्य परीक्षा परिषदेच्या जीसीसी टीबीसी नुसार आयएसएम सॉफ्टवेअर मधील मराठी रिमिक्स लेआउट ऐवजी आयोगाने हिंदी इंडिक कीबोर्ड दिला आहे. ज्यामध्ये मोठी तफावत आहे. 10 मिनिटांच्या कौशल्य चाचणीसाठी जिसीसीच्या नियमानुसार आणि आयोगाने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेनुसार 1500 की डिप्रेशन यायला हवेत. परंतु आयोगाने दिलेल्या तोंडी चाचणी मध्ये हिंदी इंडिक कीबोर्डवर 2200 की डिप्रेशन दिले आहेत.
इंग्रजी भाषेसाठी 2000 डिप्रेशन ऐवजी 3000 डिप्रेशन हा बदल केलेला रद्द करावा. कौशल्य चाचणी ही जीसीसी टीबीसी प्रमाणे घेण्यात यावी.कौशल्य चाचणीसाठीच्या उताऱ्याची शब्दमर्यादा ही जाहिरातीत सांगितलेल्या निकषाप्रमाणेच असावी(1500 की डिप्रेशन 10मिनिटात) अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहे.
टीसीएस कंपनीला कंत्राट
बीडचा बीटेक पर्यंत शिक्षण झालेला रवी राठोड म्हणाला, लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक कौशल्य चाचणी याची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा एमपीएससी ने घेतलेली आहे मात्र कौशल्य चाचणीसाठी यंदा प्रथमच टीसीएस कंपनीला कंत्राट देण्यात आलेले आहे सदर कंपनीने मराठी टायपिंग शब्द मर्यादा सात मिनिटात 120 ते 130 शब्द वाढवून 300 पर्यंत केली आहे.
तर इंग्रजी शब्द मर्यादा 180 ते 200 शब्दावरून 400, शब्द करण्यात आली आहे. 7 एप्रिल रोजी परीक्षा होणार असून केवळ एक आठवडा आधी हा अन्याकारक बदल करण्यात आला आहे. केवळ उमेदवारांना टायपिंग येते की नाही हे समजण्यासाठीची ही किमान कौशल्य आधारित परीक्षा आहे. मात्र, त्यात अशक्य स्वरूपाचे शब्द बदल करण्यात आले आहे.
नियमास धरून नाही
जळगावची निवेदिता जगताप म्हणाली, माझे बीएडपर्यंत शिक्षण झाले असून आई वडील टेलरिंगचे काम करतात. एमपीएससी परीक्षेची तयारी मी मागील चार वर्षापासून करत आहे. कोरोनामुळे दोन वर्ष वाया गेलेली आहेत. मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेक मर्यादा असतात. वेगवेगळी आव्हाने असतात. अशावेळी परीक्षा पद्धतीत अन्यकारक बदल करण्यात येत आहे.
कर सहाय्यक पदाच्या 200 जागा असून त्याकरीता 1000 उमेदवार अंतिम चाचणीस पात्र झाले आहेत. तर क्लार्क पदासाठी 1200 जागा असून त्याकरिता साडेतीन हजार विद्यार्थी पात्र झाले आहे. अशावेळी परीक्षेत अचानक बदल केले गेले ते नियमास धरून नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.