आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात विचित्र अपघात:मुंबई - बंगळुरु महामार्गावर पुण्यातील नवले ब्रिजजवळ भीषण अपघात, 8 ते 10 गाड्या एकमेकांवर धडकल्या; काही जण गंभीर जखमी

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. नंतर या भरधाव ट्रकने रस्त्यावरुन जाणाऱ्या 8 ते 10 दुचाकींना उडवले

मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. सकाळी 11 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने 8-10 गाड्यांना चिरडले असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात काही जण गंभीर जखमी असल्याचेही वृत्त आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मंगळवारी सकाळी मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलावरुन देहुरोडच्या दिशेने एक ट्रक भरधाव वेगाने येत होता. त्याचवेळी ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. नंतर या भरधाव ट्रकने रस्त्यावरुन जाणाऱ्या 8 ते 10 दुचाकींना उडवले. या विचित्र अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.

एकाच वेळी एवढ्या गाड्यांचा अपघात झाल्याने एकच गोंधळ उडाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अपघातीत लोकांची आपला जीव वाचवण्यासाठी धावाधाव सुरू झाली. रस्त्याने जात असणारे नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी धावत होते. यामुळे जखमी लोकांना गाडीतून लवकर बाहेर काढता आले नाही. दरम्यान यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

बातम्या आणखी आहेत...