आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-मुंबई मार्गावर 'बर्निंग कार'चा थरार:धावत्या कारमध्ये अचानक लागली आग, थोडक्यात वाचले तीन जणांचे प्राण

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

गुरुवारी पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर एका बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. दुपारी तीन वाजता घडलेल्या घटनेत कुटुंबातील तीन सदस्यांचा थोडक्यात जीव वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर दुपारी 3 कामशेत टनलजवळ एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. काही सेकंदातच ही कार जळून खाक झाली. या घटनेत मुद्दसर शेख आणि त्यांचे कुटुंबिय थोडक्यात वाचले. याबाबत मुद्दसर यांनी सांगितले की, कारमध्ये आग लागल्याचे कळताच आम्ही कार थांबवून बाहेर पडलो. अजून फक्त 30 सेकंद उशीर झाला असता, तर आमच्या जीवाला मोठा धोका झाला असता.

अर्धा तास ट्रॅफिक जाम
हायवेवर झालेल्या या घटनेमुळे पुणे कडून मुंबईकडून मुंबईकडे जाणारे ट्रॅफिक अर्ध्या तासासाठी जाम झाले होते.

बातम्या आणखी आहेत...