आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 वर्षीय तरुणाचा निघृण खून:शरीरापासून हात, पाय, धड, केले वेगळे; 2 दिवस उलटूनही पोलिसांकडून उलगडा नाही

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 4 जानेवारीला पोलिसांना वडगाव शेरी स्मशानभूमीच्या पुर्वेस रंगनाथ गलांडे यांचे शेतात वाढलेल्या हत्तीघासामध्ये (वय 30 ) एका तरुणाचा निघृण खून झालेला मृतदेह मिळाला होता. आरोपीने मृत तरुणाचे शरीरापासून हात, पाय, धड वेगळे केले होते. परंतू दोन दिवस उलटूनही पोलिसांचा अद्याप या खूनचा उलगडा झालेला नाही.

याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश सुरेश घाेरपडे यांनी फिर्याद दाखल केलेली आहे. संबंधित अनाेळखी व्यक्तीस काेणत्यातरी अज्ञात कारणावरुन लाेखंडी हाताेडयाने वार करुन त्याचा निघृण खून केला. त्यानंतर सदर खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे दाेन हात काेपऱ्यापासून व दाेन्ही पाय घाेटयापासून व डाेके धडा पासून वेगळे करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

सदर खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी व गुन्हे शाखेचे पोलिस पथके घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी करत आराेपींचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पोलिसांना अद्याप झालेल्या खूना संबंधित कोणतीही माहिती मिळालेली नाही. या खूनाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे करत आहे.

डिलिव्हरी बाॅयकडून 90 हजारांचा आयफोन चोरी

डिलीव्हरी डाॅट काॅम या कंपनीत डिलीव्हरी बाॅय म्हणून काम करत असलेल्या चंद्रकांत रमेश चव्हाण (वय-27,रा.वारजे,पुणे) यांनी डिलिव्हरीची ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी कर्वेनगर परिसरात दाेन जानेवारी राेजी साडेपाच वाजता पुरंदर प्लाझा याठिकाणी करण पानिंद्रे यांना डिलीव्हरी करणेसाठी फाेन करुन बाेलवून घेतले.

चव्हाण यांनी पानिंद्रे यांना पैसे देवून पार्सल घेवुन जा असे म्हणाले असता, आराेपीने त्यांचे हातातील 90 हजार 650 रुपयांचा आयफाेन जबरदस्तीने हिसाकवून घेऊन त्याचे दुचाकीवरुन पळूुून गेला आहे. याप्रकरणी आराेपीवर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...