आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील वेल्हा येथे खुनी हल्ला:पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडावर झाडल्या गोळ्या, जागीच गतप्राण

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्हयातील वेल्हा तालुक्यात विशाल हॉटेल समोर एका सराईत गुन्हेगाराचा पूर्ववैमनस्यातून अनाेळखी आराेपींनी गाेळ्या घालून निघृण खून केल्याची घटना साेमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. नवनाथ ऊर्फ पप्पूशेठ रेणूसे (रा.पाबे, रामवाडी, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच, हवेली पाेलीस ठाण्याचे पाेलीस पथक घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मयत नवनाथ रेणुसे हा साेमवारी हवेली परिसरात वेल्हे येथे आला हाेता. त्यावेळी त्याच्या मागावर असलेल्या अनाेळखी दाेन ते तीन आराेपींनी त्याचेवर भरदिवसा पिस्तुला मधून गाेळया झाडून त्याचा निघृण खून केला.

त्यानंतर दुचाकीवर हल्लेखाेर पसार झाले आहे. दरम्यान, वेल्हे पाेलीसांकडून सदर गुन्हयातील आराेपींचा शाेध सुरु करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या याप्रकारामुळे हवेली परिसरात भितीचे वातावरण नागरीकात निर्माण झाले. यासंर्दभात पुढील तपास हवेली पाेलीस करत आहे.

रुग्णवाहिका चालकास बेदम मारहाण

रुग्णवाहिका घेऊन ससून रुग्णालय परिसरात आलेल्या एका चालकास ‘तुझी अॅम्ब्युलन्स येथे कशी आली, तुझ्या मालकाचे नाव काय, तु पुन्हा येथे अॅम्ब्युलन्स घेवून आला तर तुझे हात-पाय ताेडून टाकत बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आराेपी रंजीत जानकर (वय-३०,रा.हडपसर,पुणे) या आराेपीवर बंडगार्डन पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी साेमवारी दिली आहे.

याबाबत सुनिल लहु विपट (वय-३९,रा.हडपसर,पुणे) यांनी पाेलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार चार मार्च राेजी घडलेला आहे. आराेपी रंजीत जानकर हे ससून रुग्णालय परिसरात रुग्णवाहिका चालवत आहे. त्यांचेकडील रुग्णवाहिका घेवून ससून रुग्णालय येथे ते गेले असता त्याठिकाणी आराेपीने त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली.

‘तुझी रुग्णवाहीका येथे कशी आली, तुझ्या मालकाचे नाव काय, तु पुन्हा येथे रुग्णवाहीका घेवून आला तर तुझे हात-पाय ताेडून टाकून असे बाेलुन त्यांना हाताबुक्क्याने मारहाण करुन त्याने त्याच्याकडील लाकडी दांडक्याने मारहाण केली. याबाबत बंडगार्डन पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक एस जाधव करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...