आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:फक्त दीड हजार रुपयांसाठी एकाचा खून, मोबाइल विक्रीचे पैसे परत न दिल्याने डोक्यात घातला घाव

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइल विक्रीचे दीड हजार रुपये परत न दिल्याने एकाचा खून

पुणे ,प्रतिनीधी -

जुना मोबाईल विक्री केल्यानंतर संबंधित इसमाने मोबाईल चे दीड हजार रुपये वेळेत न दिल्याने एका तरुणाने 50 वर्षाच्या इसमाच्या गळ्यावर ब्लेडने वार करुन त्याचा निर्घृण खून केल्याची घटना वारजे परिसरात घडली आहे.

अमरजीत जगन्नाथ गोयल (वय ५०, रा.वारजे पुलाजवळ, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राम श्रीमंत वाघमारे (वय -२०, रा. वारजे पुलाजवळ, वारजे,पुणे) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस कर्मचारी राहुल कदम यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वारजे उड्डाणपुलाजवळ पृथक बराटे उद्यानासमोर पदपथावर एक जण गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती वारजे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अमरजीत गोयल यांच्या गळ्यावर ब्लेडने वार करून डोक्यावर कठीण वस्तुने मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा अमरजीत गोयल आणि राम वाघमारे दोघे फूटपथावर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गोयल याला वाघमारेने जुना मोबाइल फोन दिला होता.

वाघमारेने दीड हजार रुपयात गोयलला मोबाइलची विक्री केलेली होती.मात्र, गोयलने दीड हजार रुपये न दिल्याने त्यांच्यात वाद झाला होता. या वादातून वाघमारेने गोयलच्या गळ्यावर ब्लेडने वार करुन त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीत गोयल याचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक रमेश बाबर याबाबत पुढील तपास करत आहेत.