आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यवसायाकरिता उसने घेतलेले पैसे परत न केल्याने संताेष शेषराव अंगरख (वय-४२) यांचे आराेपी गणेश पवार व त्याचे दाेन साथीदारांनी जबरदस्तीने अपहरण करुन खून केल्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणी पाेलीसांनी चार आराेपींना अटक केली; परंतु या गुन्हयातील एक सराईत आराेपी पसार झाल्याने वाकड पाेलीसांनी त्याचा पाठलाग सुरु करत त्याचा शाेध घेऊन त्यास उत्तराखंड राज्यातून शिताफीने अटक केली. ही माहिती परिमंडळ दाेनचे पाेलीस उपायुक्त काकासाहेब डाेळे यांनी शुक्रवारी दिली आहे.
प्रदीप कुमार लालजी (वय २९, मु.रा.रुदपूर, जि. उधमसिंहनगर, उत्तराखंड) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे साथीदार गणेश सुभेदार पवार (वय ३७,रा. काळेवाडी, पुणे), अरविंद गणेश घुगे (२४, रा. काळेवाडी, पुणे, मु. रा. मुखेड, जि. नांदेड), मंगेश भागुजी जगताप (३९, रा. चिंचवड, पुणे), संदिप लालजी कुमार (२१, रा. भदाेही, उत्तरप्रदेश) अशी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे.
याबाबत मृत संताेष अंगराख यांचे वडील शेषराव अंगराख यांनी वाकड पाेलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार सुरुवातीस दाखल केली हाेती. संबंधित आराेपींनी संगनमत करुन संताेष अंगराख याचे रहाटणी परिसरातून जबरदस्तीने अपहरण केले. त्यानंतर १६/८/२०२० राेजी कासारसाई येथे नेऊन त्याच्या डाेक्यात दगड घातला व जेसीबीच्या बकेटने डाेक्यात मारुन त्याचा निघृण खून केला हाेता.
त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह त्याच ठिकाणी जमीनीत पुरुन टाकला हाेता. आराेपी प्रदीप लालजी हा जेसीबी चालक हाेता व ताे गुन्हा घडल्यापासून आतापर्यंत पसार झाला हाेता. उत्तर प्रदेश मधील त्याचे मुळगावी दाेनदा जाऊन पाेलिसांनी त्याचा शाेध घेतला परंतु आराेपी मिळून आला नव्हता.
पाेलीसांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे त्याचा शाेध घेऊन त्यास उत्तराखंड राज्यातील रुदापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. जेबीसीच्या सहाय्याने मयत व्यक्तीचा खून करुन त्याचा मृतदेह कासारसाई येथे खड्डा करुन पुरल्याची कबुली त्याने दिली आहे अशी माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक एस.बी.माने यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.