आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद करणे पडले महागात:चिडवल्यामुळे दु:खी झालेल्या 7 लोकांनी मारहाण करत युवकाची केली हत्या; 2 जण अटकेत, पिंपरी चिंचवडमधील घटना

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यात खुनाच्या वाढल्या घटना

पिंपरी चिंचवडमधील डीलक्स चौक परिसरात 7 लोकांनी एका युवकाला मारहाण करत हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृतक युवक त्यांना वेड्यासारखे चिडवत होता अणि त्यांच्यावर काठीने हल्ला करत होता, असे आरोपींचे म्हणणे आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक युवकाचे नाव मनोज राजू काजबे आहे. तो सोमवारी पिंपरी चिंचवडमधील एका रस्त्यांवर उभे असलेल्या काही लोकांजवळून गेला. दरम्यान, काही लोकांनी त्याला वेडा म्हणून आवाज दिला. यामुळे रागात येऊन मनोजने एका युवकाला काठीने मारहाण केली. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या 6-7 लोकांनी मृतक मनोजला मारहाण करत त्याची हत्या केली. यामध्ये मनोज गंभीर जखमी झाला असून उपचाऱ्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

2 जण अटकेत इतर फरार
दरम्यान, या धक्कादायक घटनेत पिंपरी पोलिसांनी 7 जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात पिंपरी पोलिसांनी यश आले असून पुढील तपास सुरु असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पुण्यात खुनाच्या वाढल्या घटना
पुण्यात जानेवारी ते जून 2021 दरम्यान एकूण 139 खुनाच्या प्रयत्नांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत हा आकडा 44 होता. याचा अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 95 ने वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...