आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूची हत्या:पुण्यात सुनेने सासूची हत्या करून झुडपांमध्ये फेकला मृतदेह, विल्हेवाट लावतानाची घटना सीसीटीव्हीत; पोलिसांकडून मुलाला सुद्धा अटक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमित गौतम शिंदे (वय 22) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

पिंपरी चिंचवड शहरात सूनेन सासूचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून झुडुपात फेकून देण्यात आला. दरम्यान, मृतदेह घेऊन जातानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने संबधित प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनेतील आरोपी सून आणि मुलाला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून आरोपींना शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली.

बेबी गौतम शिंदे (वय 50 वर्ष) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. पूजा मिलिंद शिंदे (वय 22) व मिलिंद गौतम शिंदे (वय 29) असे या प्रकरणातील आरोपी सून व मुलाचे नाव आहे. अमित गौतम शिंदे (वय 22) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू बेबी शिंदे हिच्या सोबत आरोपी सून पूजा शिंदे हिचे घरगुती कारणामुळे वाद होत होते, म्हणून त्याचा राग मनात धरून आरोपी पूजा हिने ब्लाऊजच्या सहाय्याने सासूचा गळा आवळून तिचा खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतदेह पोत्यामध्ये घालून प्रथम टेरेसवर ठेवला व नंतर काही अंतरावरील बंगल्याशेजारील प्लॉटमधील झुडपात नेऊन टाकून दिला.

तसेच टेरेसवर व सोसायटीचे पाय-यावर पडलेले रक्त आरोपी मिलिंद शिंदे याने धुऊन-पुसून पुरावा नष्ट केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता पोलिसांना एक सीसीटीव्ही हाती लागला आणि प्रकरणाचा उलगडा या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण पाटील करत आहेत.

इनपुट - मोहन दुबे

बातम्या आणखी आहेत...