आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील घटना:सातवाडी परिसरात तरुणाचा खून केल्याप्रकरणी 4 आरोपींना बेड्या; बोपदेव घाटात फेकला होता मृतदेह

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेवणाच्या निमित्ताने तरूणाला बाहेर नेऊन त्याच्यावर हडपसर येथील सातवाडी परिसरात गोळ्या झाडून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी हा मृतदेह बोपदेव घाटात फेकून दिला. या संबंधित प्रकरणी हडपसर पोलिसांनी पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

याप्रकरणी संशयीत आरोपी रोहन राजेंद्र गायकवाड, योगेश भिलारे, अक्षय गंगावणे आणि चेतन कुदळे अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. गणेश नाना मुळे (21, रा. संकेत विहार, फुरसुंगी, हडपसर,पुणे) असे खुन झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील नाना तात्याराम मुळे (45, रा. फुरसुंगी, हडपसर,पुणे) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काय आहे घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी आणि खून झालेला तरूण गणेश हे एकमेकांचे मित्र आहेत. दि. 10 डिसेंबर रोजी ते गणेशला जेवण्यासाठी बाहेर जायचे आहे म्हणून घेऊन गेले. परंतु, बराच वेळ तो घरी न आल्याने रविवारी त्याच्या वडीलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार हडपसर पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच कोंढवा पोलिसांना बोपदेव घाटात एका तरूणाचा मृतदेह आढळला.

वादातून केला खून

गोळी झाडून तरूणाचा खुन केल्याचा प्रकार यावेळी निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या चौकशीमध्ये हडपसर पोलिस ठाण्यातून बेपत्ता झालेल्या गणेशशी मिळते जुळते वर्णण समजल्याने हडपसर पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता तो मृतदेह गणेश मुळे याचाच असल्याचे आढळले. दरम्यान गुन्ह्याचा तपास करत असताना दि. 10 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ते गणेशला जेवणासाठी बाहेर घेऊन गेले होते. सातववाडी परिसरात एका ठिकाणी त्यांनी मद्य प्राषण करून जेवण केले. यातूनच झालेल्या वादातून संशयितांनी गणेश याच्यावर गोळी झाडून त्याचा खून केला.

पुरावे केले नष्ट

दरम्यान घाबरलेल्या अवस्थेतील चौघांनी पुरवा नष्ठ करण्यासाठी साठी त्याचा मृतदेह बोपदेव घाटात फेकुन दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर चौघांनाही वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मागर्दशनाखाली बेड्या ठोकण्यात आल्या. बुधवारी दुपारी त्यांना लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास हडपसर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...