आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भरदिवसा हत्या:एका युवकाला 6 जणांनी बेदम मारहाण करत केली हत्या, टँकरने पाणीपुरवठा करण्यावरून झाला वाद; घटना CCTV मध्ये कैद

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही घटना पुण्यातील औद्यगिक क्षेत्र असलेल्या चाकण एमआयडीसीत शुक्रवारी भरदिवसा घडली आहे

पुण्यात शुकवारी भरदिवसा रस्त्यावर एका युवकाला चाकूने ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये कैद झाली असून आज या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्‍ट दिसते की, एका युवकावर 6 जण प्राणघातक हल्ला करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना पुण्यातील औद्यगिक क्षेत्र असलेल्या चाकण एमआयडीसीत शुक्रवारी भरदिवसा घडली आहे. यामुळे तेथील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, या संबंधित प्रकरणात मृतकांची ओळख पटली असून त्याचे नाव अतुल भोसले आहे. तो महालुंगा परिसरातील कंपनीला दररोज दोन टँकर पाणीपुरवठा करीत होता. याच पार्श्वभूमीवर आरोपी अक्षय शिवाळे आणि अतुल यांचा वाद झाला. दरम्यान, शुक्रवारी दोघांमध्ये फोनवरून वाद झाला आणि अक्षयने अतुलला आव्हान देत ममता मिठाईच्या दुकानासमोर बोलावले.

अशी झाली अतुलची हत्या
जसा अतुल त्या ठिकाणावर पोहचला. आधीच तेथे अक्षयचे काही साथीदार उपस्थित होते. लगेचच आरोपींनी मृतक अतुलला बेदम मारहाण करत चाकुने व काठीने अनेकवेळा वार केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी ताबडतोब घटनास्थळावरुन पसार झाले. तेथीलच काही स्थानिकांनी अतुलला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्या जोरदार रक्सस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.

दोन आरोपी अटकेत, 4 फरार
संबंधित प्रकरणात अतुलच्या नातेवाईकांनी पोलिस स्टेशनमध्ये जात अक्षय शिवाळे, गणेश धर्माळे, गोल्या भालेराव आणि इतर तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवला. परंतु, सध्या दोन आरोपी अटकेत असून 4 फरार आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी एक टीम गठीत करण्यात आली असून त्याचा तपास सुरु असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...