आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिशातील पैसे चाेरण्यास प्रतिकार करणाऱ्या मजुराचा खून:14 वर्षाच्या मुलासह दाेन जण पाेलिसांच्या ताब्यात

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मजुरी काम करत असलेल्या एका तरुणाच्या खिशातील पैसे एका अल्पवयीन मुलासह दाेघांनी चाेरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास मजुर तरुणाने प्रतिकार केल्याने संबंधित दाेघा आराेपींनी तरुणास लाकडी बांबुने बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याचा प्रकार पाेलीसांच्या तपासात उघडकीस आल्याची माहिती बुधवारी पाेलिसांनी दिली आहे.

महादेव नागनाथ चेंडके (वय 23,रा.खाेपडेनगर, कात्रज, पुणे) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी पाेलीसांनी 14 वर्षाच्या मुलासह दाेनजणांना ताब्यात घेतले आहे. प्रदीप हिरालाल शिंदे (19, रा.काेंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. याबाबत आराेपी विराेधात पाेलीस उपनिरीक्षक अतुल दत्तात्र्य थाेरात यांनी भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

खुनाचा गुन्हा

सदरचा प्रकार 24 फेब्रुवारी राेजी घडलेला असून सुरुवातीला पाेलिसांनी याबाबत अक्समात मयत म्हणून गुन्हा दाखल केला हाेता परंतु खुनाचा प्रकार उघडकीस आल्यावर संबंधित आराेपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शवविच्छेदन अहवालातही खूनाचे समोर

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाेलिसांना 24 फेब्रुवारी राेजी कात्रज परिसरात पुणे सातारा रस्त्यावर गुडलक माेर्टस इमारतीच्या समाेर महादेव चेंडके या तरुणाचा मृतदेह मिळून आलेला हाेता. त्यानुसार पाेलीसांनी अक्समात मयतचा गुन्हा दाखल केला हाेता. सदर गुन्हयाचा तपास तक्रारदार पाेलीस उपनिरीक्षक अतुल थाेरात हे करत हाेते. त्यावेळी तपासा दरम्यान दाेन आराेपींनी त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले.तसेच शवविच्छेदन अहवालातही खून झाल्याचे निष्पन्न झाले.

मयत महादेव चेंडके याचे खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेत असताना त्यांनी प्रतिबंध व शिवीगाळ केल्याचे कारणावरुन सदर दाेन आराेपींनी त्यास दाेन लाकडी बांबुने मारुन जीवे ठार मारल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस तावडे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...