आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक:जेवणाचा डबा बनवला नाही म्हणून पतीकडून पत्नीचा खून, शवविच्छेदन करताना जखमा दिसल्याने प्रकार उघड

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील कोंढवा परिसरात उंड्री याठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका कुटुंबातील पत्नीने पतीसाठी कामावर जाताना जेवणाचा डबा बनवला नाही म्हणून राग आल्याने पतीने पत्नीचा खून केल्याची खळबळजनक बाब उघडकीस आलेली आहे.

याप्रकरणी आरोपी सोमनाथ महादेव पांडगळे( वय -30 वर्ष ,राहणार -उंड्री,पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर शितल सोमनाथ पांडगळे (वय 27 )असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी आरोपीवर कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात पोलीस हवलदार संजय देसाई यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. सदरची घटना 13 मे रोजी घडलेली आहे.

शवविचछेदन अहवालात बाब उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल पांडगळे हिला नातेवाईकांनी फिट आली म्हणून ससून रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर महिलेचा शवविचछेदन आणि पंचनामा करताना सदर महिलेच्या अंगावर जखमा दिसल्याने तसेच, डॉक्टरांनी सदर महिलेला मृत्यूपूर्वी मारहाण झाले असल्याचे प्रमाणपत्र पोलिसांना दिले.

मारहाण करून गंभीर जखमी

याबाबत महिलेचा पती सोमनाथ पांडगळे याच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली असता, कामाला जाताना पत्नीने डबा बनवून दिला नव्हता त्यामुळे त्यांच्यात वाद होऊन भांडणे झाल्याचे सांगितले. यावेळी त्यानी हाताने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात, पायावर, अंगावर मारहाण करून तिला गंभीर जखमी केले.

पुढील तपास सुरु

मारहाणीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी आरोपी सोमनाथ पंडागळे याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी संतोष सोनवणे, संदीप भोसले, संजय मोगल घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे पुढील तपास करत आहे.