आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ:पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबादच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष, 5 जागांसाठी आज होणार मतदान

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक डिसेंबर रोजी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर होणारी ही राज्‍यातील पहिलीच निवडणूक असल्‍याने प्रशासनाने विशेष काळजी घेऊन नियोजन केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्‍या एका जागेसाठी ६२ उमेदवार तर शिक्षक मतदारसंघाच्‍या एका जागेसाठी ३५ उमेदवार उभे आहेत. पुणे विभागात पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार ४ लक्ष २६ हजार २५७ तर शिक्षक मतदारसंघात ७२ हजार ५४५ मतदार आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी विभागात एकूण एक हजार २०२ मतदान केंद्रे तर शिक्षक मतदारसंघासाठी ३६७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पदवीधर मतदारसंघातील जिल्‍हानिहाय मतदान केंद्रांची संख्‍या अशा प्रकारे, पुणे ३५७, सातारा १७६, सांगली १९१, कोल्‍हापूर २८१ आणि सोलापूर जिल्‍हा १९७ तर शिक्षक मतदारसंघातील मतदान केंद्रे- पुणे १२५, सातारा ४४, सांगली ४८, कोल्‍हापूर ७६ आणि सोलापूर ७४. मतदान प्रक्रियेसाठी आणि मतमोजणीसाठी पुरेसे मनुष‍यबळ उपलब्‍ध करण्यात आले आहे.

देशमुख-लाड यांच्यातच प्रमुख लढत : पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्यात प्रमुख लढत हाेणार असल्याचे दिसून येत आहे. लाड यांनी मागील निवडणुकीत राष्ट्रवादीशी बंडखाेरी करून निवडणूक लढवली हाेती. परंतु या वेळी त्यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्याने निवडून येण्याची कसरत त्यांना पार करावी लागणार आहे. मनसे उमेदवार रूपाली पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत काेकाटे हेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असून ते कशा प्रकारे लढत देतात हे पाहण्यासारखे आहे. शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार प्रा.जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांच्यात दुरंगी लढत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान,औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर भाजपकडून शिरीष बोराळकर हे रिंगणात असून याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

नागपूर विभागात दोन लाख मतदार ठरवणार उमेदवारांचे भवितव्य
महाराष्ट्र विधान परिषेदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी १ डिसेंबर रोजी विभागातील ३२२ मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत आहे.नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत १९ उमेदवार रिंगणात आहेत. अभिजित वंजारी काँग्रेस, संदीप जोशी भाजप, राजेंद्रकुमार चौधरी (रिपब्लिक पार्टी ऑफ इंडीया), इंजिनियर राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी), नितीन रोघें (अपक्ष) हे प्रमुख उमेदवार आहेत.

अमरावतीमध्ये २७ उमेदवार रिंगणात
अमरावती । विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान होत असून २७ जण रिंगणात आहेत. एकूण ३५ हजार ६२२ या उमेदवारांचे भाग्य मतपेटीत कैद करतील. त्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत ७७ मतदान केंद्रे उघडण्यात आली आहेत. मावळते आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे या वेळी शिवसेनेचे उमेदवार असले तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तर भारतीय जनता पक्षातर्फे विदर्भ यूथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष प्रा. नितीन धांडे, कपिल पाटील यांच्या लोकभारती पक्षातर्फे दिलीप निंभोरकर मैदानात आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser