आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप:9 ते 11डिसेंबर दरम्यान रंगणार; एक हजारपेक्षा अधिक खेळाडू होणार सहभागी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. 9 ते 11 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार असून एक हजारपेक्षा अधिक खेळाडू यात सहभागी होणार आहेत.

अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने येत्या 9, 10 आणि 11 डिसेंबर 2022 रोजी नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप, पुणे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळूंगे - बालेवाडी येथे पार पडणार आहे, अशी माहिती युएसएफआयचे जनरल सेक्रेटरी व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. तपन पाणिग्रही यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

अचिंता पंडित (कोषाध्यक्ष ), रिअर अॅडमिरल पीडी शर्मा (अध्यक्ष ), कौस्तव बक्षी (महाव्यवस्थापक ), जॉर्ज मकासरे (उपाध्यक्ष ) आणि डब्ल्यू एचओ प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. तपन पाणिग्रही म्हणाले, फिनस्विमिंग हा स्पर्धात्मक जलतरण स्पर्धेचा नवीन प्रकार असून जगात लोकप्रिय प्रकार आहे. भारतात हा जलतरण प्रकार लोकप्रिय होत आहे. या स्पर्धेमध्ये भारतातून 34 राज्ये व केंद्रशासित प्रदेशामधील 300 हून अधिक जिल्ह्यांतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील 1000 हून अधिक स्पर्धक व 70 तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेत स्त्री व पुरुष या दोन्ही गटात विविध वयोगटांमध्ये एकूण 516 पदकांसाठी 172 विभागात स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. तसेच या स्पर्धेतील विजेते खेळाडू 13 ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान विंडसर, ओंटारियो, कॅनडा येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटी (इंडिया) चे लाइफसेव्हिंग स्पोर्ट 2022 हे अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

जीव वाचवणारे खेळ हे एकमेवाद्वितीय असतात कारण ते एकमेव असे खेळ आहेत ज्यात प्रथम जीवन वाचवण्यासाठी कौशल्ये शिकली जातात आणि त्यानंतरच समुद्र, समुद्रकिनारे किंवा स्विमिंग पूलमधील स्पर्धांसाठी विविध कौशल्ये आणि तंत्रे वापरली जातात. हे जीवनरक्षक खेळ नागरिकांसाठी ‘प्रशिक्षण शिबिर’ म्हणून काम करतील, असे मत डॉ. तपन पाणिग्रही यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटी (इंडिया) ही रॉयल लाइफसेव्हिंग सोसायटी कॉमनवेल्थची अधिकृत शाखा आहे आणि इंटरनॅशनल लाइफसेव्हिंग फेडरेशनची सदस्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्व निवडींना मान्यता दिली जाईल.

बातम्या आणखी आहेत...