आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वारंवार बदनामी केल्याचा आरोप

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने शरद पवार यांची बदनामी करीत असून वारंवार त्यांची प्रतिमा हनन करीत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून पडळकर यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विश्राम बाग पोलिस ठाणे आणि पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे.

पवारांवर बिनबुडाचे आरोप

तक्रारीबाबत पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होणे समजू शकते. मात्र, गोपीचंद पडळकर सातत्याने शरद पवारांबाबत खोटी आणि बिनबुडाची माहिती पसरवत आहेत. नुकतेच पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचा भगवा मफलर टाकून घोषणा देतात, अशी प्रतिक्रिया दिली होती.

सामंतांवरील हल्ल्याबाबत बेजबाबदार विधान

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करणारी पवारांची माणसं होती, अशी बेजबाबदार आणि खोटी विधाने पडळकर यांनी केली. त्यांचे हे विधान अतिशय गंभीर असून आमच्या सामाजिक व राजकीय संस्कृतीला धक्का पोहोचवणारे आहे. आम्ही या विधानाचा जाहिर निषेध करीत असून त्यांनी आमचा पक्ष व सर्वोच्च नेत्याच्या विरोधात खोटी माहिती पसरवून आमची बदनामी केली आहे. याबद्दल त्यांच्यावर योग्य त्या कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देवून त्याचप्रमाणे विश्रामाबग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने यांच्याकडे तक्रार दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे व प्रदीप देशमुख, दिपाली धुमाळ, रविन्द्र माळवादकर, वनराज आंदेकर, दत्ता सागरे, महेंन्द्र पठारे, किशोर कांबळे, मोहसिन शेख, दिपक पोकळे, रुपाली पाटील व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते.

बातम्या आणखी आहेत...