आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे-सातारा रोड सिटीप्राईड चौकात पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ मृणालिनी वाणी यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्र सरकारने र गॅस सिलिंडर 50 रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मृणालिनी वाणी यांनी केंद्र सरकारने आज गस सिलिंडर केलेल्या 50 रुपये दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला यामुळे दरवाढीची झळ सामान्य नागरिक आणि गृहिणी यांना बसणार आहे
पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मृणालिनी वाणी यांच्या नेतृत्वाखाली विभागीय महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, बाळासाहेब अटल, संतोष नांगरे, सागरराजे भोसले, शशिकला कुंभार पूनम पाटील, स्वाती चिटणीस,दीलशाद अत्तार, सुशांत ढमढेरे सतीश वाघमारे,दिलीप अरुंदेकर,समीर पवार, सोनाली उजागरे,वर्षाराणी कुंभार आदी पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. तसेच यावेळी आंदोलन चालू असताना रस्त्यावरुन जाणाऱ्या महिला तसेच नागरिक यांनी या आंदोलनात सहभागी होऊन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी वैशाली नागवडे म्हणाल्या, केंद्र सरकारने गॅस दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. आघाडी सरकारच्या काळात गॅसचे दर साडेचारशे रुपये होते. मात्र, मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गॅस दरवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे लोक पुन्हा गॅस सोडून स्वयंपाकासाठी चुलीकडे वळत आहेत ही बाब चिंताजनक आहे. गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ही गप्पा असून त्या सध्या कुठे दिसत नाहीत. गॅसचा वापर लोकांना बसण्यासाठी करावा लागणार असून यापुढील काळात चुलीवरच स्वयंपाक लोकांनी करावा अशा प्रकारे केंद्र सरकार वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गॅसचे दर असेच वाढत राहिल्यास नागरिकांना मोफत सुरू वाटप करण्याची योजना आम्हास हाती घ्यावी लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.