आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंतरवाडी चौकात दुचाकींच्या शोरुमचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 60 हजारांच्या चार नवीन दुचाकी चोरुन नेल्याची घटना फुरसुंगी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्यांचा माग काढला जात आहे, अशी माहिती बुधवारी देण्यात आली आहे. पराग चंद्रकांत बोराडे (वय 34, रा. धायरी ,पुणे) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पराग बोराडे यांचे भागीदारीत मंतरवाडी चौक परिसरात मल्टी विंग नावाचे दुचाकी शोरुम आहे. त्यांच्याकडे खासगी कंपनीच्या दुचाकींची विक्री केली जाते. 1 ते 3 एप्रिल दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शोरुमचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर एचएफ डीलक्स या प्रत्येकी 60 हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल आणि दोन हिरो कंपनीच्या स्प्लेंडर प्रत्येकी 70 हजार रुपये किमतीच्या अशा चार नवीन दुचाकींची चोरी केली आहे.
बाजारभावनुसार चोरीस गेलेल्या दुचाकींची किंमत 2 लाख 60 हजार रुपये आहे. तक्रारदार फरक बोराडे हे मार्च 2023 पासून व्यवसाय करत असून नुकतेच शोरूम सुरू झाल्याने अद्याप दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नव्हते. तसेच सुरक्षा रक्षकही नेमण्यात आलेला नव्हता. याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने सदर 4 दुचाकी चोरून नेल्याचे पोलिसांच्या प्रार्थमिक तपासात समोर आले आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे पुढील तपास करीत आहेत.
घरफोडीत 80 हजाराचा माल चोरीस
पर्वती परिसरातील मित्र मंडळ कॉलनी मधील आदित्य रेसिडेन्सी या ठिकाणी चौथ्या मजल्यावर एका कार्यालयात अज्ञात इसमाने घरफोडी करून, ऑफिसचे बंद सरकते दरवाजे उघडून, कार्यालयात प्रवेश करत 40 हजार रुपये किमतीचा टॅब, 40 हजार रुपयांचा लॅपटॉप, पेन ड्राईव्ह असा एकूण 80 हजारांचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे. याप्रकरणी जान्हवी प्रसाद गलगले (वय 41) यांनी अज्ञात आरोपी विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.