आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅडमिंटनचे फुल काढतांना झाला अनर्थ:तारांना स्पर्श झाल्याने 10 वर्षीय मुलीचा मृत्यू; पुण्यातील घटना

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील लोणी काळभोर मध्ये असलेल्या कदमवावस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बॅडमिंटनचे फुल काढत असतांना विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने 10 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भाग्यश्री धनाजी बनसोडे (10) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

काय आहे घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री मागील रविवारी घऱाच्या टेरेसवर बॅडमिंटन खेळत होती. यावेळी बॅडमिंटनचे फुल टेरेसच्या दुसऱ्या बाजुला पडले. ते काढण्यासाठी भाग्यश्री इमारतीवर गेली होती. टेरेसवरुन गेलेल्या विजवाहक तारांच्या खाली चार फुट उंचीची भिंत असल्याने, तिने शिडीच्या साह्याने फुल काढत असताना, ती विज वाहक तारांच्या संपर्कात आली. हा झटका इतका तीव्र होता की त्यात ती 50 टक्के भाजली गेली. स्थानिकांनी तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

मृत्यूची झूंज अपयशी ठरली

मागील सात दिवसापासुन मृत्युशी चाललेली तिची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. भाग्यश्री ही तिच्या कुटुंबीयांसह महादेव खंदारे यांच्या घरात भाड्याने राहिला होती. बिल्डींग उभी असलेल्या जागेतुन विजेच्या तारा गेलेल्या आहेत. विज वितरण कंपणीने खंदारे यांनी याआधी देखील तारांच्या खाली इमारत बांधु नये याबाबत लेखी कळवले होते. याबाबत पुढील तपास लोणीकाळभोर पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...