आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:पोलिसाच्या त्रासाला कंटाळून 26 वर्षीय महिला पोलिसाची आत्महत्या, भावाला मोबाईलवर आत्महत्येपूर्वी पाठवली सुसाईड नोट

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दीपाली बाबुराव कदम (वय 26) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेने आपल्या भावाला मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली आहे. त्यानंतर पोलिस नाईक वाल्मीक गजानन अहिरे याच्यांविरोधात यवत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी दिपाली यांची पोलिस नाईक वाल्मीक आहिरे यांच्यासोबत ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेऊन बाल्मीक हा तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. दरम्यान, दिपालीचे लग्न ठरल्याची ही माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...