आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:लग्नाच्या आमिषाने महिला पोलिस शिपायावर तरुणाचा बलात्कार; संशयिताला अटक

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस शिपायावर तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी प्रफुल्लचंद्र बाळासाहेब मिडगुले (रा. मिडगुलेवाडी, शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका महिला पोलीस शिपायाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडीत महिला पोलीस शिपायाला मिडगुलेने विवाहाचे आमिष दाखविले होते.

विवाहाच्या आमिषाने त्याने महिला पोलीस शिपायावर वेळोवेळी बलात्कार केला. तिने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे याबाबत तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मिडगुले याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात खडकी परिसरात २२ किलो गांजा जप्त

पुणे शहरातील खडकी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघाजणाना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २२ किलो गांजा, दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.

नवीन उमाकांत पिल्ले (वय -३४, रा. खडकी,पुणे), जितेंद्र कुलदीपसिंग मुलगानी (वय ३२, रा. भोसरी,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. पिल्ले आणि मुलगानी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा लावला होता.मात्र, पोलिसांना पाहताक्षणी पिल्ले आणि मुलगानी दुचाकीवरुन तात्काळ पसार झाले.त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना पकडून त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत २२ किलो गांजा मिळून आला आहे.

पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसाेडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक अमर कदम, उपनिरीक्षक वैभव मगदूम, उपनिरीक्षक भानुदास भालेराव, तानाजी कांबळे, संदेश निकाळजे, जहांगिर पठाण, ऋषिकेश दिघे, शिवराज खेड सागर जाधव आदींनी ही कारवाई केली आहे.