आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे बॅनर:'जत्रेत खेळणाऱ्या पैलवानांनी तालमीत खेळणाऱ्यांचा नाद करू नये', अजित पवारांच्या बॅनरची चर्चा

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यामध्ये अजित पवारांचे हे पोस्टर लावण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे अजित पवार हे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा अजित पवारांची चर्चा आहे. पवार समर्थकांकडून पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. जत्रेत खेळणाऱ्यांनी तालमीतल्या पैलवानांचा नाद करू नये असे या बॅनरमध्ये म्हटले आहे. गेल्या काही महिन्यात अजित पवार यांच्यावर किरिट सोमय्या यांच्याकडून सातत्याने गंभीर असे आरोप केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आल्याच्या चर्चा आहेत.

पुण्यामध्ये अजित पवारांचे हे पोस्टर लावण्यात आले आहे. भारती विद्यापीठ परिसरात नगरसेवक युवराज बेलदरे यांनी अजित पवारांच्या समर्थनार्थ हा बॅनर लावलेला आहे. जत्रेत खेळणाऱ्या पैलवानांनी तालमीकडे खेळणाऱ्या पहिलवानचा नाद करू नये असे त्यांनी म्हटले आहे. तसेच 'समझने वालों को इशारा काफी है' असेही यात म्हटले आहे. यासोबत अजित पवार यांचा हातात तलवार घेतलेला फोटोही यामध्ये आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते किरीट सोमय्या अजित पवारांवर आरोप करत आहेत. अजित पवारांच्या संबंधित व्यक्तींच्या साखर कारखान्यावर आणि त्यांच्या बहिणींच्या घरी देखील आयकर विभागाने छापेमारी केली होती. दरम्यान आता पुण्यात अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...