आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला लागलेली आग पुन्हा भडकली आहे. दुपारी लागलेली आग अग्निशमन दलाला 2 ते 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर विझविण्यात यश आले. पण संध्याकाळी 7 वाजता या इमारतीच्या 6व्या मजल्यावर आग पुन्हा भडकली. ही आग विझविण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
करोना आजाराला रोखण्यासाठी तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याला ही आग लागली होती. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
रामा शंकर हारिजन, बिपीन सरोज, सुशील कुमार पांडेय, महेंद्र इंगळे आणि प्रतिक पाशाते अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व इलेक्ट्रीक काम करणारे मजुर होते.
कोरोनाची कोव्हिशील्ड लस सुरक्षित
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीजी लसीचे उत्पादन सुरू असलेल्या सीरम इंस्टीट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागली. सुदैवाने कोव्हिशील्ड लस सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचे काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही. कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली जागा सुरक्षित आहे.
कोव्हिशील्डच्या पुरवठ्यावर परिणाम नाही
कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. परंतु, लसीची निर्मिती ही सीरम इन्स्टिट्यूटच्या जुन्याच इमारतीत करण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मिळत आहे.
Looks like a major fire at the Serum Institute of India, the manufacturer of the Covishield vaccine. Hope everyone is safe.
pic.twitter.com/4h92dx9WTO
— Anand Ranganathan (@ARanganathan72) January 21, 2021
सीरम इंस्टिट्युटला महत्व का?
सीरम इंस्टिट्य़ुटने आतापर्यंत 1.5 अब्ज डोस विकल्या आहेत. हा एक विक्रम आहे. आकड्यांवर लक्ष घातल्यास जगातील 60% लहानग्यांना सरासरी सीरमचे एक व्हॅ्क्सीन आवश्य लागले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) कडून मंजुरी मिळवलेल्या सीरमने 170 देशांना व्हॅक्सीनचा पुरवठा केला आहे. यात पोलिओ, डिप्थीरिया, टिटनेस, पर्ट्युसिस, HIV, BCG, आर-हॅपेटायटिस बी आणि रुबेला अशा व्हॅक्सीन्सचा समावेश आहे .
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.