आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीला सलाम:अंधत्वावर मात करत पुण्यातील जयंत मंकले यूपीएससीमध्ये देशात 143 वा, कठोर परिश्रम घेत खेचून आणले यश

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

यूनियन पब्लिक सर्व्हिस कमीशन (यीपीएससी)ने सिव्हिल सर्व्हिसेज एग्जामिनेशन-2019 चा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातून 829 महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या परीक्षेत प्रदीप सिंह यांचा देशात पहिला क्रमांकार आहे. तर महाराष्ट्रात नेहा भोसले हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामध्ये एका जिद्दी अंध तरुणानेही यश मिळवले आहे. कठोर परिश्रम घेत जयंतने देशात 143 वा क्रमांक पटकावला आहे.

जयंतने यापूर्वीही 2018 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र त्यावेळी त्याचा 937 वा क्रमांक होता. याच कारणामुळे त्यांनी दोन वर्ष पुन्हा परिश्रम करून पुन्हा परीक्षा दिली, आणि यावेळी त्यांना यश खेचून आणले आले. यंदा जयंतने 143 वा क्रमांक मिळवला आहे.

जयंतने संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयातून 2013 ला प्रथम श्रेणीतून जयंतने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. यानंतर त्यानंतर तळेगाव दाभाडे व भोसरी येथे दोन वर्षे मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून नोकरी केली. याच काळात त्याला डोळ्यांना त्रास होऊ लागला.

'रेटिना पिग्मेन्टोसा' हा डोळ्यांचा आजार त्याला उद्भवला आणि त्याची दृष्टी गेली. यानंतरही तो हरला नाही. खचलाही नाही. त्याने यूपीएससी परिक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि यश घेचून आले. राज्यभरातून या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या यशाचे श्रेय मयंक हा तीन गोष्टींना देतो. एक म्हणजे त्याच्या आईला आणि कुटुंबियांना, दुसरे म्हणजे त्याच्या मार्गदर्शक आणि शिक्षकांना आणि तिसरे म्हणजे मित्रांना तो श्रेय देतो. त्यांच्यामुळेच मला हे यश मिळाले असल्याचे तो म्हणतो.

बातम्या आणखी आहेत...