आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालय परिसरात गोळीबार:माजी सैनिकाच्या पत्नीचा मृत्यू; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरुर न्यायालयात सुरू असलेल्या पाेटगीच्या केसकरिता न्यायालय आवारात आलेल्या माजी सैनिकाने पत्नी व तिच्या आईवर गाेळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली हाेती. या घटनेत संबंधित माजी सैनिकाच्या पत्नीचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी पाेलिसांनी गाेळीबार करणाऱ्या आराेपीस बेड्या ठोकल्या आहेत.

पोटगीची केस होती सुरू...

दीपक पांडुरंग ढवळे असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. दीपक ढवळे हा माजी सैनिक असून सध्या ठाणे जिल्हयातील अंबरनाथ याठिकाणी राहवयास आहे. त्याची पत्नी मंजुळा रंगनाथ झांबरे (रा.वाडेगव्हाण, ता.पारनेर, अहमदनगर) हिचा याप्रकरणात मृत्यू झाला आहे. तर त्याच्या सासूवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. दीपक ढवळे हा शिरुर न्यायालयाच्या आवारात पाेटगीच्या केस सुनावणीकरिता मंगळवारी सकाळी आला हाेता. त्यावेळी त्याच्या साेबत त्याचा सख्खा भाऊ संदीप ढवळे हा सुध्दा हाेता. ते दाेघेही अंबरनाथ येथून रिक्षाने शिरुर येथे आले हाेते.

अचानक केला गोळीबार

न्यायालयाच्या परिसरात आल्यानंतर त्याने अचानक त्याच्या जवळील परवाना प्राप्त पिस्तूल मधून पत्नी मंजुळा झांबरे व तिची आई यांच्यावर गाेळीबार केला. या घटनेत पत्नी ठार झाली असून, सासू गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर रांजणगाव पाेलिसांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस यांनी आराेपीस शस्त्रासह ताब्यात घेतले आहे. याबाबत शिरुर पाेलिस पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...