आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाॅरेक्स ट्रेडिंग म्हणजेच परकीय चलन व्यवहारात गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून, एका महिलेची तब्बल २० लाख ८३ हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
याबाबत फसवणूक झालेल्या एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला बिबवेवाडी परिसरात राहायला आहे. महिलेच्या मोबाइलवर आरोपीने सातत्याने संपर्क साधला होता. त्यांना परकीय चलन व्यवहारात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले होते.त्यानंतर महिलेकडून ऑनलाइन पद्धतीने आरोपीने वेळोवेळी २० लाख ८३ हजार रुपये घेतले. त्यानंतर महिलेला कोणताही परतावा देण्यात आला नाही.
महिलेने आरोपीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. अखेर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरोधात तक्रार दिली.याबाबत पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहे.
मोबाईल चोरणारा चोरटा जेरबंद
शहराच्या विविध भागात रात्रीच्या वेळी पादचाऱ्या नागरिकना लुटणाऱ्या एका आरोपीला खडक पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. सजाद मोहम्मद हनीफ शेख (वय -४२ , रा. कामशेत, सध्या रा.लोहीयानगर ,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून चोरीचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. शिवाजी रस्त्यावरून जाणाऱ्या मध्यरात्री एकाला अडवून शेखने त्याच्याकडील मोबाइल बळजबरीने पळवून नेला होता.
पोलिसांच्या पथकाकडून चोरट्याचा शोध घेण्यात येत होता. सजाद शेख हा सराईत चोरटा आहे. तो मंडई परिसरात थांबल्याची माहिती खडक पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली होती,त्यानुसार सापळा लावून त्याला पकडण्यात आले. चौकशीत त्याने रात्री जाणाऱ्या पादचाऱ्यांना अडवून त्यांच्याकडील मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली.
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, गुन्हे शाखेचे निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राकेश जाधव, अजीज आदींनी ही कारवाई केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.