आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:जितेंद्र गवारेंची एव्हरेस्टवर यशस्वी चढाई, दीड महिन्यापूर्वी माऊंट अन्नपूर्णा देखिल केले सर

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिन्याभराच्या आत दोन अष्टहजारी शिखरांवर चढाई करण्याची अभूतपूर्व कामगिरी जितेंद्र यांनी केली आहे.

जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर गिरिप्रेमीच्या जितेंद्र गवारे यांनी आज, 12 मे 2021 रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास यशस्वी चढाई करून नवा इतिहास रचला. अवघ्या 25 दिवसांपूर्वी, 16 एप्रिल रोजी जितेंद्र यांनी गिरिप्रेमीच्या माऊंट अन्नपूर्णा मोहिमेंतर्गत जगातील दहावे उंच शिखर असलेल्या माऊंट अन्नपूर्णा एक वर देखील यशस्वी चढाई केली होती. महिन्याभराच्या आत दोन अष्टहजारी शिखरांवर चढाई करण्याची अभूतपूर्व कामगिरी जितेंद्र यांनी केली आहे.

जेष्ठ गिर्यारोहक व गिरिप्रेमीच्या अष्टहजारी मोहिमांचे नेते उमेश झिरपे, एव्हरेस्ट शिखरवीर भूषण हर्षे व तीन अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई करणारे डॉ. सुमित मांदळे यांचे जितेंद्र गवारे यांना मार्गदर्शन लाभले. यापूर्वी जितेंद्र यांनी 2019 साली जगातील तिसरे उंच शिखर असलेल्या माऊंट कांचनजुंगावर तिरंगा फडकवला होता. तसेच 2019 सालीच माऊंट अमा दब्लम या तांत्रिकदृष्ट्या अतिशय खडतर असलेल्या शिखरावर यशस्वी चढाई करून आपली कौशल्ये सिद्ध केली होती.

एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान पुण्यातून एव्हरेस्ट शिखरवीर गणेश मोरे, गिर्यारोहक विवेक शिवदे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील भूगोल विभागातील प्राध्यापक डॉ. अविनाश कांदेकर यांनी हवामानाचे अचूक अंदाज जितेंद्रला कळविले. त्यामुळे जितेंद्र व त्यांचा शेर्पा साथीदार पासांग झारोक शेर्पा यांना 8848.86 मीटर इतक्या उंच एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करता आली. पुण्यातील वडगाव शेरी येथील रहिवाशी असलेल्या जितेंद्र यांच्या दुहेरी यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...