आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पवयीन तीन वर्षाच्या चिमुरडीस खाऊच्या आमिषाने घरात नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने २१ वर्षाची सक्तमजुरी आणि 35 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा विशेष सत्र न्यायाधीश श्रीपदा पाेंक्षे यांनी सुनावली आहे. सागर अरुण चव्हाण (वय-३३,रा.भाेसरी,पुणे) असे शिक्षा झालेल्या आराेपीचे नाव आहे.
न्यायालयाने या केसचा निकाल देताना आराेपीस 35 हजार रुपये दंड लावला, ती सर्व रक्कम ही पीडित मुलीला भरपाई स्वरुपात देण्याचे सांगितले आहे. सदरची घटना ही ११ एप्रिल २०१५ राेजी भाेसरी पाेलीस ठाण्याचे हद्दीत घडलेली हाेती.
मुलीच्या आईने याबाबत आराेपी विराेधात भाेसरी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली हाेती. संबंधित पीडित मुलगी ही घरा बाहेर खेळण्यासाठी गेलेली असता तिची आई घरात काम करीत हाेती. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांची तीन वर्षाची चिमुरडी राहते घरी रडत रडत आली. त्यामुळे त्यांनी मुलीस रडण्याचे कारण विचारले असता, तिने घराजवळ राहणारा आराेपी सागर चव्हाण याने आपल्यासाेबत गैरकृत्य केल्याचे सांगितले. त्यामुळे पिडित मुलीच्या आईने तात्काळ पतीस फाेन करुन घरी बाेलवून घेतले. त्यानंतर आराेपी ज्या कुटुंबाकडे रहावयास आलेला हाेता त्यांनाही मुलीच्या आईने कल्पना दिली.
अखेर या घृणास्पद प्रकारा संर्दभात पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पाेलीसांनी आराेपी सागर चव्हाण यास अटक केली. आराेपीवर पाेलीसांनी बलात्कारासह पाॅक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल केला हाेता. या केस मध्ये विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी कामकाज पाहिले. त्यांनी नउ साक्षीदार तपासून आराेपीस या केस मध्ये न्यायालयाने जास्तीत जास्त कडक शिक्षा देण्याची मागणी केली.
पीडित मुलीची साक्ष, तिच्या आईची साक्ष, वैद्यकीय पुरावा या गाेष्टी केस मध्ये महत्वपूर्ण ठरल्या. भाेसरी पाेलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पाेलीस निरीक्षक आर.टी.दरवडे यांनी याबाबतचा तपास केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.