आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हत्या:पुण्यातील कोंढव्यात थरकाप उडवणारी घटना, घरात घुसून टोळक्यांनी केली अट्टल गुन्हेगार पप्पू पडवळ याची निर्घृण हत्या, हल्लेखोर पसार 

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील कोंढव्यात आज थरकाप उडवणारी घटना घडली आहे. घरात घुसून टोळक्यांनी अट्टल गुन्हेगार पप्पू पडवळ याची निर्घृण हत्या केली आहे. कोयत्याने सपासप वार करून पप्पू पडवळचा खून करण्यात आला आहे. घनश्याम उर्फ पप्पू पडवळ असं  खून झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. पप्पू पडवळवर त्याच्यावर अनेक वेगवेगळे प्रकारचे गुन्हे दाखल होते. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी अज्ञात टोळक्यांकडून पप्पू पडवळचा खून करण्यात आला. हे टोळके गुन्हेगाराच्या घरात घुसले आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात पप्पू हा जागीच ठार झाला आहे. पप्पू गतप्राण झाल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. पप्पू पडवळ हा मोठा गुन्हेगार आहे. यापूर्वीही त्याच्यावर एका टोळीकडून हल्ला करण्यात आलेला होता. 

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांक़डून केला जात आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser