आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सोमवारी ‘हॉर्न ठेवा बंद’ उपक्रम:‘नो हॉकिंग डे’ निमित्त आयोजन; विविध प्रमुख चौकांमध्ये राबवणार जनजागृती

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, पुणे पोलीस (वाहतूक शाखा) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने 'नो हाँकीग डे' अर्थात, हॉर्न ठेवा एक दिवस बंद अशी संकल्पना राबविण्यात येणार आहे. सोमवार, दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पुण्यातील विविध प्रमुख चौकांमध्ये एकाच वेळी नो हाँकीग डे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू, प्रा.पद्माकर पुंडे आदी उपस्थित होते. 12 डिसेंबरला टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे मुख्य जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे. यावेळी कार्यक्रमाला पुणे पोलिस वाहतूक विभागाचे उपायुक्त विजयकुमार मगर, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रा.पद्माकर पुंडे करणार आहेत.

काय म्हणाले पाठक?

देवेंद्र पाठक म्हणाले, पुण्यात साधारणत: दररोज एक कोटी पेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो व यातील 90 टक्के हॉर्न हे अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर हे दिवसाला दीड ते दोन तास ट्रॅफिक मध्ये असतात आणि या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना बऱ्याचशा दुष्परिणामांना सामारे जावे लागते, त्यामुळे नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

पुण्यातील विविध प्रमुख चौकांमध्ये व पेट्रोलपंपांवर एकाच वेळी जनजागृती केली जाणार आहे. पुण्यातल्या विविध आय टी कंपनी, हॉटेल्स, मॉल्स, पीएमपी बसेस, विविध सामाजिक संघटना, सोसायटी या सर्वांनाच उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'नो हाँकींग डे' पाळण्याचे आवाहन

मकरंद टिल्लू म्हणाले, शाळा, हॉस्पिटल अशा ठिकाणी नो हॉर्न विषयी जनजागृती करणारे फलक असतात. पण आपण त्यांना विशेष गांभीर्याने घेत नाही. त्याची आठवण पुणेकरांना करून देण्यासाठी आणि या समस्येला गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यासाठी 12 डिसेंबरला हा 'नो हाँकींग डे' पाळण्याचे आवाहन संस्था करीत आहेत.

असा आहे उद्देश

सध्या पुणे हे एकमेव असे शहर आहे जिथे वाहनांची संख्या ही लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, वाढत्या ध्वनिप्रदूषणात हॉर्न चा आवाज प्रमुख कारण आहे. त्याच प्रमाणे पुणेकरांना उच्च रक्तदाब, हदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा देखील सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी नो हॉर्न संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...