आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुनी पेन्शन याेजनेसाठी पुण्यात संप:जिल्ह्यात 32 विभागातील 68 हजार कर्मचारी संपावर, सेंट्रल बिल्डींग परिसरातील सर्व कार्यालय ओस

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनी पेन्शन याेजना लागू करण्यात यावी याकरिता राज्यभरात मंगळवारी राज्य सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, महसूल सह विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदाेलन केले. पुणे जिल्हयात ३२ विभागातील ६८ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले हाेते. शासनाने तात्काळ जुनी पेन्शन याेजना लागू करावी अशी मागणी यावेळी करत जाेरदार घाेषणाबाजी करत निषेध आंदाेलन केले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी मागण्या केल्या की, जुनी पेन्शन याेजना तात्काळ लागू करण्यात यावी, रिक्त जागाची भरती केली जावी, निवृत्तीचे वय ६० करावे, बालवाडी, अंगणवाडी, आशा वर्कस; , बदली कर्मचारी यांना कायमस्वरुपी शासकीय सेवेत सहभागी करुन घ्यावे, महिला कर्मचाऱ्यांना केंद्रा प्रमाणे लाभ व सवलती लागू करण्यात याव्यात.

पुणे शहरातील महत्वपूर्ण शासकीय विभाग असलेल्या सेंट्रल बिल्डींग परिसरातील सर्व कार्यालय मंगळवारी ओस पडल्याचे पाहवयास मिळाले. कर्मचारी संपावर असल्याने अनेकजण इमारतीचे समाेर येऊन आंदाेलनात सहभागी झाले. इमारतीच्या मुख्य प्रवेश द्वारावर बेमुदत संपाचे अनेक पाेस्टर ही कर्मचाऱ्यांनी लावले हाेते. सरकारी कर्मचारी कामावर हजर नसल्याने कार्यालयात शुकशुकाट पाहवयास मिळाला.

त्याचप्रमाणे ससून रुग्णालय, फाेटाे झिंकाे मुद्रणालय, पुणे जिल्हा परिषद आदी शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदाेलन करत सहभागी झाले. पांढऱ्या टाेप्या घालून त्यावर ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ असे मजूकर लिहलेला परिधान करुन कर्मचारी घाेषणाबाजी करत आंदाेलन करत हाेते.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाचे कर्मचारी यांनीही जुनी पेन्शन याेजनासाठी पाठिंबा दिला. परंतु दहावी-बारावीची परीक्षा सुरु असल्याने त्या वेळापत्रकावर परिणाम हाेऊ नये याकरिता त्यांनी सहकार्याची भूमिका पार पाडली. राज्य मंडळा तर्फे दहावी व बारावीची परीक्षा नियाेजनानुसार हाेतील. परंतु त्यानंतर आम्ही सहकार्य करणार नाही याची दखल सरकारने घ्यावी अशी मागणी शिक्षक संघटनेनी केली.

बातम्या आणखी आहेत...