आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:पुण्यातील लोहगाव विमानतळ 14 दिवस बंद राहणार, बुकिंग असलेल्या प्रवाशांना सहन करावा लागणार मनस्ताप

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान लोहगाव विमानतळावरुन प्रवासी उड्डाणे बंद करण्यात येणार

लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे आता 14 दिवस बंद राहणार आहेत. 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे ही विमानतळावरील धावपट्टीच्या कामांकरीता बंद राहणार आहेत. यामुळे आता प्रवाशांना मुंबई विमानतळावर जावे लागेल. तसेच बुकिंग केलेल्या प्रवाशांचा काय असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र त्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

लोहगाव विमानतळाच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. हे काम सप्टेंबर 2020 पासून हाती घेण्यात आलेले आहे. 26 ऑक्टोबरपासून या कामाचा महत्वाचा टप्पा सुरू करण्यात आलेला होता. तेव्हापासून लोहगाव विमानतळावरुन रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणे ही बंद होती. त्यामुळे गेल्या वर्षभर या विमानतळावरुन फक्त दिवसभरातच उड्डाणे होत होती. मात्र आता 16 ऑक्टोबरपासून 14 दिवसांसाठी ही उड्डाणे देखील बंद राहणार आहेत. 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान लोहगाव विमानतळावरुन प्रवासी उड्डाणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहेत.

बातम्या आणखी आहेत...