आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीलबंद बंगल्यात चोरी:पुण्यातील डी. एस. कुलकर्णी यांच्या सीलबंद बंगल्यामध्ये झाली चोरी, सहा लाखांचा ऐवज लंपास; चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चतुःश्रुंगी मंदिराजवळ डीएसकेंचा 40 हजार चौरस फुट जागेमध्ये बंगला आहे.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या सीलबंद बंगल्यामध्ये चोरी झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून डी.एस कुलकर्णी हे तुरुंगात आहे. दरम्यान ईडीने त्यांच्यावर केलेल्या कारवाईच्या वेळी त्यांचा बंगलाही जप्त करण्यात आला होता. आता याच बंगल्यामध्ये चोरी झाली असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चतुःश्रुंगी मंदिराजवळ डीएसकेंचा 40 हजार चौरस फुट जागेमध्ये बंगला आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा बंगला ईडीकडून जप्त करण्यात आला. हा बंगला सील असतानाही येथे चोरी झाली आहे. चोरट्यांनी बंगलातील महागड्या वस्तू लंपास केल्या असल्याची माहिती आहे. याप्रकरणी भाग्यश्री अमित कुलकर्णी यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

या बंगल्यामधून दरवाज्याचे सील आणि लॉक तोडून चोरट्यांनी बंगल्यातील महागड्या वस्तू लंपास केल्या आहेत. या बंगल्यातील 8 एलईडी टीव्ही, कॉम्प्युटर्स , लॅपटॉप, सीडी प्लेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरामधील चांदीच्या वस्तू, कॅमेरा, गिझर असा एकूण सहा लाखांचा ऐवज लंपास केली असल्याची माहिती आहे. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...