आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्स मॅनेजरला मुली पुरवण्याचे आमिष:अपहरणानंतर ब्लॅकमेल करूनही लुटले, विश्रांतवाडी परिसरातील घटना

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीला शरीर संबंधासाठी मुलगी देतो असे आमिष दाखवत त्याचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याला मारहाण करत त्याच्या जवळील ऐवज लुटण्यात आला. एवढेच नाही तर त्याच्या बायकोला ही बाब सांगेल अशी धमकी देत ब्लॅकमेल करूनही पैसे उकळण्यात आले आहे. ही घटना विश्रांतवाडी परिसरात घडली असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

या प्रकरणी एका 53 वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार 17 ते 19 वर्ष वयाच्या चार तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धीरज वीर (वय 19) आणि जॉय मंडल (वय 19 ) यांच्यासह दोन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना 3 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत घडली.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित फिर्यादी हे एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ते कामानिमित्त एका लॉजवर गेले असतांना त्यांची ओळख आरोपींसोबत झाली. दरम्यान त्यांना शरीर संबंधासाठी मुलगी देतो असे आमिष दाखवून आरोपींनी त्यांना बंडगार्डन परिसरात बोलावले. फिर्यादीहे त्यांच्या कार ने त्या ठिकाणी आल्यावर आरोपींनी त्यांचे अपहरण करत त्यांना मारहाण केली. त्यांचे एटीएम कार्ड काढून घेतले आणि येरवडा परिसरातील एका एटीएम मधून 25 हजार रुपये त्यांनी जबरदस्तीने काढले.

पत्नीला सांगण्याची धमकी

यानंतर ही बाब त्यांच्या पत्नीला सांगण्याची धमकी देत यांच्याकडून 93 हजार रुपये ब्लॅकमेल करून लुटले. यानंतर आणखी पैसे मागत त्यांना जीवे मारण्याची धमकी त्यांनी फिर्यादीला दिली. यानंतर त्यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली आहे. याबाबत पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...