आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिष दाखवून गंडा:टेलिग्रामच्या माध्यमातून ऑनलाइन जॉबची थाप; चित्रपट व्यावसायिकाची 97 लाखांची फसवणूक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टेलिग्रामच्या माध्यमातून ऑनलाइन जॉब देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका 56 वर्षेीय चित्रपट व्यवसायिकाची तब्बल 97 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.

पुण्यातील बावधन परिसरात राहणाऱ्या सदर चित्रपट व्यवसिकास अज्ञात मोबाईल क्रमांक धारक आणि टेलिग्राम खातेदार यांनी संपर्क करून सीटीएम कंपनीने ट्रॅव्हल रेटिंगसाठी प्रवासाच्या ठिकाणांसाठी फाईव्ह स्टार रेटिंग मिळवून द्या असा ऑनलाइन जॉब देण्याचे बहाना केला.

त्यानंतर विविध कारणांसाठी सीटीएम कंपनी यांचे प्रतिनिधी म्हणून मीरा पटेल व सुधा चव्हाण यांनी तक्रारदार यांच्यासोबत संपर्क साधून रेटिंग देऊन कमिशन देण्याच्या बहण्याने खोटी जॉब प्रोफाइल तयार करून ते खरोखर असल्याचे भासवून लबाडीच्या उद्देशाने स्वतःच्या आर्थिक फायदा करीता तक्रारदार यांची आरोपींनी 97 लाखांची फसवून केली आहे.

35 लाख रुपयांसाठी गमावले 61 लाख रुपये

वेगवेगळ्या टास्कच्या माध्यमातून चित्रपट व्यवसायकास ट्रॅव्हल रेटिंग वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करण्यास आरोपींनी भाग पाडले. त्यानंतर त्याला सुरुवातीला दहा हजार रुपये वेलकम बोनस दिला. त्यावर 813 रुपये कमिशन दिल्याने व्यवसायिकाचा विश्वास बसला. त्यानंतर हळूहळू सदर रक्कम वाढवत नेत, व्यवसायिकाने 68 हजार रुपये भरल्यावर त्यास अकरा हजार 855 रुपये कमिशन दिले. त्यानंतर अपग्रेडेशन नावाखाली मोठे ट्रांजेक्शन करण्यास भाग पाडले.

त्यानंतर व्यवसायिकाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र, आरोपींनी संबंधित गुंतवलेले पैसे परत हवे असल्यास आणखी रक्कम भरावी लागेल असे सांगत एकूण 56 ट्रांजेक्शनद्वारे 61 लाख रुपये भरण्यास सांगत 97 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत हे करत आहेत.