आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते स्वारगेट या 11.4 किमीच्या मार्गामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा सह किमीचा मार्ग भुयारी आहे. या भूमिगत मार्गाच्या भुयाराचे काम दिनांक चार जून 2022 रोजी टनेल बोअरिंग मशीनच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे.
मेट्रोच्या भुयारामध्ये ट्रक, ओव्हर हेड विद्यूत तारा, आणि सिग्नलिंगची कामे वेगाने करण्यात आली. मंगळवारी रेंजहील डेपो ते रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक आणि त्यानंतर रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर मेट्रो स्थानक त्यानंतर सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक अशी तीन किमीची मेट्रो चाचणी घेण्यात आली. पुणे मेट्रोच्या महत्वाच्या टप्यांपैकी हा तांत्रिक दृष्टया अत्यंत्य महत्वाचा असा टप्पा आहे. पुणे मेट्रोचे 85 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे अत्यंत्य वेगाने सुरु आहेत.
भूमिगत मार्गाचे काम तांत्रिक दृष्टया अत्यंत् आव्हानात्मक असते. बोगदा बनविताना मोठ्या प्रमाणावर निघणारे दगड-गोटे यांना जमीच्या खालून साधारणतः 70 ते 80 फुटांवरून वर आणून त्यांची योग्यरीत्या व योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावावी लागते . तसेच भुयारी स्थानकांसाठी 'कट अँड कव्हर' तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे खोदून खालून बांधकाम करत वर यावे लागते.
शिवाजी नगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट ही अत्यंत्य गजबजलेली ठिकाणे असून या भागांतून सामानाची ने- आण करणे अत्यंत् जिकरीचे आहे. या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या सामानासाठी वाहतुकीची वाहने रात्री 12 ते सकाळी पाच या वेळातच ने आण करत होती. अशा आव्हानात्मक परिस्थितीत काम करत मेट्रोने रेंजहील ते सिव्हिल कोर्ट यातील भूमिगत मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आणले आहे आणि यामुळेच भूमिगत मेट्रो चाचणी करणे शक्य झाले आहे.
मंगळवारची चाचणी दुपारी तीन वाजता रेंजहील डेपो येथून सुरु झाली. रेंजहील डेपो ते रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक अश्या रॅम्प वर वाटचाल करत ट्रेन स्थानकापर्यंत पोहचली. तेथे ड्रायव्हर ने आपला कक्ष बदलला व मेट्रो ट्रेन रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकातील भूमिगत स्थानकापर्यंत पोहचली. या चाचणीसाठी गेल्या आठवड्यापासून मेट्रोचे ट्रक, विद्युत, सिग्नलिंग, देखरेख व संचालन असे सर्व विभाग सतत कार्यरत होते. या चाचणीला -30 मिनिटे वेळ लागला व चाचणी नियोजित उद्दिष्टनुसार पार पडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.