आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासादायक बातमी:पुण्यात आज एकाही कोरोनाबाधित रूग्णाच्या मृत्युची नोंद नाही, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्युची नोंद झालेली नाही. पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. 6 फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमच पुण्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. पुण्याच्या महापौरांनी यासंदर्भात ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे.

'पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.6 फेब्रुवारी 2021 नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय.' असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

रविवारी मुंबईत देखील करोना महामारीनंतर पहिल्यांदाच दिवसभरात एकाही करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला नव्हता

बातम्या आणखी आहेत...