आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे जिल्ह्यातील घटना:जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान राडा, 20 वर्षीय तरुणाची हत्या; तर नऊ जण जखमी

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जखमींवर शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या माळवदे वस्ती येथे ट्रक्टर शेतात नेण्याच्या वादातून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारी झाली. यामध्ये एका 20 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रवींद्र माळवदे असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. या मारहाणीत मृत रविंद्र माळवदे यांच्या कुटूंबातील 7 जण जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या गटातील 2 जण जखमी झाले आहेत. जखमींवर शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कवठे येमाई येथील माळवदे वस्ती येथील भावकी मध्ये शेतीचा वाद होता. याबाबत मोजणीही झाल्या होत्या. परंतु, सोमवार दुपारच्या दरम्यान हा वाद टोकाला गेला आणि दोन गटात तुफान राडा सुरु झाला.

या दरम्यान रवींद्र माळवदे याच्या डोक्याला धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद घेण्याचे काम चालू आहे. दोन्ही गटातील नागरिक या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. रवींद्र माळवदे याच्या काही नातेवाईकांनाही मारहाण झाली असून, उपाचारासाठी त्याना शिरूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलिस उपनिरीक्षक बिरुदेव काबुगडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...