आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएसए क्रिकेट लीगचे शेअर्स देण्याचे आमिष:व्यावसायिकाची तब्बल 55 लाखांची फसवणूक; 5 जणांवर गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युएसए क्रिकेट काैन्सीलकडे 20-20 या क्रिकेट क्रिडा प्रकारात क्रिकेट स्पर्धा चालू करण्यासाठी युएसएस क्रिकेट लिगचे 40 टक्के शेअर्स मिळवून देण्याच्या अमिषाने एका व्यवसायिकाची तब्बल 55 लाख रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पाच जणांवर पुण्यातील अलंकार पोसिल ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

साैरभ पांडे, वंदना कृष्णा, राशिद खान, सिराज हुसेन, विक्रम चाैधरी (सर्व रा.मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. याप्रकरणी आराेपी विराेधात आशिष पाेपटराव कांटे (वय-४१,रा.एंरडवणा,पुणे) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.हा प्रकार 2019 ते आजपर्यंत घडलेला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींनी तक्रारदार आशीष कांटे यांना युएसए क्रिकेट काैन्सीलकडे 20-20 क्रिकेट स्पर्धा सुरू हाेणार असल्याचे सांगितले.

क्रिकेट स्पर्धाच्या मालकी हक्काचे शेअर्स घेतल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळेल असे आमिष त्यांना आराेपींनी दाखवले. युएसए क्रिकेट लीगचे 40 टक्के शेअर्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी तक्रारदार यांचेकडून वेळाेवेळी एकूण 55 लाख रुपये विश्वासाने घेतले. परंतु युएसए क्रिकेट लीगचे 40 टक्के शेअर्स मिळवून न देता तसेच त्यांचे गुंतवणुक करण्यासाठी घेतलेले पैसे परत न करता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन आराेपींनी त्यांची विश्वासघात करुन फसवणूक केली आहे. याबाबत पुढील तपास अलंकार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन सपताळे करत आहे.

वीज कर्मचाऱ्यांना मारहाण

पुण्यातील काेंढवा भागात हजरा काॅम्प्लेक्स येथील भाग्याेदय नगर येथे पाच डिसेंबर राेजी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ शहंकर राेंढे (वय-32) हे त्यांचे सहकारी सिध्दार्थ चव्हाण यांचे साेबत कामासाठी गेले हाेते. त्यावेळी आराेपी अफजल कादर कपाडीया, असिफ कादर कपाडिया, माेहम्मद अफजल कपाडीया व एका अनाेळखी इसमाने त्यांना आमचे लाईटचे मीटर कट का केले याकारणावरुन त्यांचे शर्टचे बटण ताेडून त्यांचे हातातील लाईटचे मीटर हिसकावले. त्यानंतर दाेन्ही कर्मचाऱ्यांचे कानाखाली देवून हाताने व पायाने मारहाण करुन त्यांना धमकी देत त्यांना शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केले आहे. याप्रकरणी आराेपींवर काेंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...