आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune News | Wife, Sister in law, Daughter Locked House; A Case Has Been Registered Against Both Of Them In Yerawada Police Station

फोनला प्रतिसाद न दिल्याचा राग:पत्नी, मेव्हणी, मुलीला घरात कोंडले; दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीच्या ओरडण्याला व फोनला प्रतिसाद न दिल्याच्या रागातून पत्नी, मेव्हणीला तसेच आपल्या मुलीला घरात बंद करून कुलुप लावणार्‍यांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शालीमार सागर शिंदे (40, रा. बोरा सोसायटी, कल्याणीनगर, येरवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर शिंदे आणि दिपक कोरगावकर (रा. मुंढवा पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर शिंदे हा फिर्यादी शालीमार यांचा पती आहे तर दीपक हा पतीचा जवळचा नातेवाईक आहे. पतीच्या ओरडण्याला व त्याच्या फोनला प्रतिसाद न दिल्यामुळे व पत्नीने घराचा दरवाजा न उघडल्यामुळे आरोपी यांनी बघून घेण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी, फिर्यादीची बहीण व मुली राहत असलेल्या घराला बाहेरून कुलुप लावून बंद करून त्यांना घराबाहेर येण्यास प्रतिबंध केला. तसेच मुलीलाही मारहाण केल्याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 6 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला.

चोरट्यांचा पोबारा

साहेबांना मुलगा झाला आहे. त्यानिमित्त ते साड्या वाटप करत असून, तुम्ही तुमच्या गळ्यातील दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगत दोन चोरट्यांनी हातचालाकीने महिलांकडील अडीच लाखांचे दागिने घेऊन पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवार वाड्यासमोरच्या समोर भरदुपारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी 59 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार या शुक्रवार पेठेत राहण्यास आहेत.

पिशवी परत करत पोबारा

त्या व त्यांची बहिण खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या. यादरम्यान, दोघेजन त्यांच्याजवळ आले. त्यांनी आमच्या साहेबांना मुलगा झाल्याने ते फुकट साड्या वाटप करत आहेत. तुम्हीही चला, अशी बतावणी केली. त्यांना गळ्यातील दागिने पिशवीत काढून ठेवण्यास सांगितले. त्यानूसार त्यांनी दोन लाख 40 हजारांचे दागिने काढून पिशवीत ठेवले. ती पिशवी चोरट्यांनी त्यांच्याकडे घेऊन हातचालाकीने त्यातील दागिने काढून घेतले व त्यांना पिशवी परत केली व तेथून पोबारा केला.

बातम्या आणखी आहेत...