आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो व्हेइकल डे:पुण्यातील लक्ष्मी रोडवर नो व्हेइकल डे साजरा, रस्त्यावर दिसली सजावट आणि गाण्यांची मैफल...

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील लक्ष्मी रोडवर आज नो व्हेइकल डे साजरा करण्यात आला. या निमित्त लक्ष्मी रोडवरील वाहनांची वाहतूक बंद ठेवून केवळ पादचाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला. या रस्त्यावर महानगरपालिकेने एक फलक लावले आहे. त्यानुसार, सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा रस्ता वाहनांसाठी बंद राहील अशी सूचना देण्यात आली आहे.

पुण्यात रोज होणारा सततचा ट्रॅफिक जाम आणि गर्दी पाहता महापालिकेने एका दिवसासाठी हा उपक्रम हाती घेतला.

यामध्ये नागरिकांसह स्थानिक व्यापाऱ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला.

नेहमीच गजबजलेला आणि ट्रॅफिकने भरलेला हा रस्ता आज मोकळा आणि स्वच्छ दिसून आला.

खास पादचाऱ्यांसाठी या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. त्यावर कुंड्या आणि इतर वस्तू ठेवून त्याची सजावट करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या ठिकाणी काही नागरिकांनी महापालिकेच्या उपक्रमाला प्रतिसाद देत सेल्फी देखील काढले.

बातम्या आणखी आहेत...