आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे देशातील दोन नंबरचे सुरक्षित शहर:एनसीआरबीचा अहवाल आला समोर, प्रति एक लाख लोकांमध्ये 256 गुन्हे

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून देशामध्ये पुणे क्रमांक 2 चे शहर असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहराच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. पुणे पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेसाठी राबविलेले वेगवेगळे उपक्रम फायदेशीर ठरले आहेत.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सराईत टोळ्यांविरूद्ध केलेल्या मोक्का कारवाया, एमपीडीएनुसार स्थानबद्धता, रायझिंग गँगचा बिमोड, अल्पवयीन गुन्हेगारांचे समुपदेशनामुळे गुन्हेगारीला आळा बसला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार 2021 मध्ये पुणे हे हिंदुस्थानातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर ठरले आहे.

तिसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर हैद्राबाद

अहवालानुसार कोलकाता हे सर्वात सुरक्षित शहर असून तेथे दखलपात्र गुन्ह्यांची आकडेवारी प्रति एक लाख लोकसंख्येवर 103.4 आहे. तर पुण्यात गुन्ह्यांची संख्या (256.8) आहे. तिसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर म्हणून हैद्राबादने गौरव प्राप्त केला असून त्याठिकाणी गुन्ह्यांची संख्या (259.9) एवढी आहे. पुण्यात महिला सुरक्षिततेसह कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून राबविण्यात आलेले नाविण्यपुर्ण उपक्रम फायदेशीर ठरले आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाईला गती

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूतीसाठी मागील दोन वर्षांपासून पोलीस ठाणे स्तरावर सराईतांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. हद्दीतील नामचिन गुंड, रायझिंग गँग, गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांची यादी बनवून प्रतिबंधात्मक कारवाईला गती दिली होती. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत झाली आहे.

ऑपरेशन ऑलआउट

विशेषतः सराईतांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कास्त्र उगारून सफाया केला आहे. त्याशिवाय खंडणीखोर, अवैध सावकारी मोडीत काढण्यासाठी थेट गुन्हे दाखल केले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह महिला सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाकडून दंडुका उगारण्यात आला. त्यासह गुन्हे शाखेकडून ऑपरेशन ऑलआउट, गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख कमी झाला आहे.

एनसीआरबीए अहवाल

  • कोलकाता- 103.4
  • पुणे- 256.8
  • हैद्राबाद- 259.9
  • कानपूर - 336.5
  • बंगळुरू- 427.2
  • मुंबई - 428.4
बातम्या आणखी आहेत...